Home देश many dalit houses were set on fire: मुला-मुलांमध्ये वाद झाला; दलितांची संपूर्ण...

many dalit houses were set on fire: मुला-मुलांमध्ये वाद झाला; दलितांची संपूर्ण वस्तीच जाळून टाकली – many dalit houses were set on fire in jaunpur in uttar pradesh chief minister yogi adityanath took serious note


जौनपूर: लहान मुलांमध्ये खेळताना झालेला वाद वाढत जाऊन त्याचे पर्यवसन अनेक दलितांची घरे जळाण्याच्या संतापजनक घटनेत होण्याची घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात घडली आहे. दलितांच्या वस्तीत समाजकंटकांनी हाणामारीही केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ३५ हल्लेखोरांना अटक केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेतली असून आरोपींविरूद्ध रासुकाअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

या संताप आणणाऱ्या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सरायख्वाजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदेठी गावात दलितांची काही मुले शेळी चरत होती. त्याचवेळी दुसर्‍या समाजातील काही मुले तेथे आली. दोन्ही बाजूंच्या मुलांमध्ये कसल्याशा मुद्द्यावर वाद झाला. हा वाद वाढत गेला. पुढे, हा वाद इतका वाढला की मग मोठी माणसे या वादात पडली आणि या वादाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले.

रात्री उशिरा दलित वस्तीला लावली आग

दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये चर्चा झाल्यानंतर शेवटी हे प्रकरण मिटले. मात्र, रात्री काही लोकांनी दलित वस्तीत जात तेथील घरांना आग लावली, असे सांगितले जात आहे. या आगीत अनेक दलितांची घरे भस्मसात झाली. आपले प्राण वाचवण्यासाठी लोक बाहेर पडले, परंतु त्यांचे बरेच पाळीव प्राणी भाजले. लोकांचे घरातील सर्व सामानही जळून खाक झाले.

दलित वस्तीवर हल्ला

३५ जणांना अटक, अनेकांचा शोध सुरू

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित कारवाई सुरू केली. या प्रकरणात आतापर्यंत ३५ लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच उर्वरित आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात नूर आलम आणि जावेद सिद्दीकी असे दोन मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आरोपींना लावणार रासुका

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्याने आरोपींवर गँगस्टर अ‍ॅक्ट आणि रासुका (एनएसए) अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे स्थानिक एसएचओविरूद्ध बेजबाबदारपणा दाखवल्याबाबत विभागीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पीडितांना नुकसान भरपाई आणि घरे देणार

मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबांच्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख २६ हजार ४५० रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर पीडित कुटुंबांना प्रत्येकी १-१ लाख रुपये समाज कल्याण विभागाकडून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत ७ पीडित कुटुंबांना घरे देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health minster rajesh tope: चाचण्यांसाठी पुन्हा दरकपात – maharashtra goverment again reduced price of corona test

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्यात करोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली...

Lasalgaon onion market: मुंबई बाजारात कांद्याची आवक घटली – onion imports declined in mumbai due to onion auction close in lasalgaon onion market

म. टा. वृत्तसेव, नवी मुंबईकांद्याची मर्यादेपेक्षा अधिक साठवणूक करणाऱ्या साठेबाजांवर धाडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर, कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये लिलाव बंद पडले आहेत....

Recent Comments