Home देश Marathi Headlines in Brief: Headlines in Brief: आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदीबाबत केंद्र...

Marathi Headlines in Brief: Headlines in Brief: आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा – 26 june 2020: todays important marathi news round up on maharashtra times


आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंदीबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा

रेल्वेनंतर आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत आज घेतलेल्या निर्णयानुसार, येत्या १५ जुलैपर्यंत देशातून परदेशात जाणारी तसेच परदेशातून देशात होणारी आंतरराष्ट्रीय कमर्शियल विमान वाहतूक सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात देशांतर्गत विमानसेवा मात्र सुरू राहणार आहे.

रोहित पवारांमुळे जळगावातील प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखडला

नगरः महायुती सरकारच्या काळात मंजूर झालेले मात्र, नंतर जळगाव जिल्ह्यात हलविण्यात आलेले भारत बटालियनचे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यात आणण्यात आमदार रोहित पवार यांना यश आले. आता हे केंद्र पूर्वीच्याच जागी म्हणजे जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे होणार आहे. गृहविभागाचा तसा आदेश येथे प्राप्त झाला आहे.

महिलेच्या पोटातून काढला तब्बल ४ किलोचा गोळा; धुळ्यात शस्त्रक्रिया

धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यंत किचकट अशी शस्त्रक्रिया करून एका महिलेच्या पोटातून तब्बल ४ किलोचा गोळा काढला आहे. डॉक्टरांच्या या प्रयत्नांमुळं महिलेला जीवदान मिळालं असून तिची प्रकृती आता उत्तम आहे.

ऑनलाइन टीव्ही विकायला गेला; ३९ हजार गमावून बसला

पुणे: ओएलएक्सवरून टीव्ही विकणे बाणेर भागातील व्यक्तीला चांगलेच महागात पडले. टीव्ही खरेदीच्या बहाण्याने चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन ३९ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्राहकांची ‘हजामत’; केस कापणेही महागले; आता ‘एवढी’ रक्कम मोजा!

राज्यात दाढी आणि कटिंगचे दर वाढून महिनाही होत नाही तोच पुन्हा एकदा कटिंग आणि हेअर डायचे दर वाढले आहेत. रविवारपासून ग्राहकांना कटिंगसाठी १०० रुपयांऐवजी १५० रुपये तर हेअर डायसाठी १०० रुपयांऐवजी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या रविवारपासून राज्यातील सर्व सलून सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

‘भारतीय महिला असं करत नाहीत’, बलात्कार प्रकरणात न्यायालयाची टिप्पणी

कर्नाटक उच्च न्यायालयानं एका कथित बलात्कार प्रकरणात २७ वर्षांच्या आरोपी तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. सोबतच उच्च न्यायालयानं तरुणावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेच्या वर्तणुकीवर टिप्पणीही केली. ‘बलात्कारानंतर थकल्यामुळे तिथेच झोपले’ असं ४२ वर्षीय तक्रारदार महिलेनं आपल्या जबाबात कोर्टासमोर म्हटलं होतं. यावर उच्च न्यायालयानं ‘भारतीय महिला असं करत नाहीत’ अशी टिप्पणी करत आरोपीला जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती कृष्ण एस दीक्षित यांनी या प्रकरणाची सुनावणी केली.

करोनाची लस येण्याआधीच बिल गेट्स यांचं चिंता वाढवणारं वक्तव्य

सगळ्या जगाचे लक्ष करोनाला रोखणाऱ्या लसीवर लागले आहे. अनेक देशांमध्ये करोनाच्या विषाणूला अटकाव करणाऱ्या लसीवर संशोधन सुरू असून काही लस चाचणीच्या निर्णायक टप्प्यावर आली आहे. मात्र, लस विकसित झाली तरी करोनाची बाधा होणारच नाही, याची खात्री देता येणार नसल्याचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबईमध्ये झालेल्या १९९२-९३मधील बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुविख्यात गुंड टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

काश्मीर: अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमी

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. तर या हल्ल्यात एका स्थानिक मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही माहिती सीआरपीएफने दिली आहे.

२५ दिवसांच्या शूटिंगचे ‘जेठालाल’ घेतो ३६ लाख

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेला लोकांनी भरभरून प्रेमदिलं. एवढ्या वर्षांनंतरही लोकांची या मालिकेसाठीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. या मालिकेतील जेठालालची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिलीप जोशीचंही जबरदस्त फॅनफॉलोविंग आहे. फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्यांना महागड्या गाड्या विकत घेण्याची क्रेझ आहे. याशिवाय २५ दिवसांच्या चित्रीकरणासाठी दिलीप जोशी जवळपास ३६ लाख रुपयांचं मानधन घेतात.

आजारपणात बहिणीनं फोन केल्याचा आनंद वाटला: धनंजय मुंडे

‘माझ्या आजारपणाच्या काळात बहीण पंकजा हिनं फोन केला आणि सदिच्छा दिल्या, याचा आनंद वाटला,’ अशी भावनिक प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली. ‘आमच्यात संघर्ष झाला होता. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. असं असतानाही बहिणीचा फोन आल्याचा आनंद झाला, याचा आनंद झाला, असं ते म्हणाले.

वर्ल्ड कप २०१९: सामन्याआधी पाक चाहत्याने दिल्या होत्या शिव्या!

वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानला कधीच भारताचा पराभव करता आला नाही. २०१९ मध्ये मँचेस्टर येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा त्यांचा पराभव करत विजयाची परंपरा कामय ठेवली होती. पण या सामन्याच्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या चाहत्याकडून भारतीय खेळाडूंना शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूने याचा खुलासा केला.

मी इंदिरा गांधींची नात आहे, जी कारवाई करायची ती करा: प्रियांका गांधी

कानपूरमधील एका आश्रयगृहातील अनेक मुलींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या मुद्दयावरून राजकारण तापत चालले आहे. याच मु्द्द्यावरून काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाने काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांना नोटीस पाठवली होती. त्या नोटीशीला आज शुक्रवारी प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर दिले आहे. मी इंदिरा गांधी यांची नात आहे, मी भारतीय जनता पक्षाची अघोषित प्रवक्ता नाही, जी कारवाई करायची आहे ती करा, असे या नोटीशीला उत्तर देताना प्रियांका म्हणाल्या.

सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचं प्रमोशन करणार राजकुमार

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या निधनामुळे बॉलिवूडपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत अनेकांनी दुःख व्यक्त केलं. दरम्यान, सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या २४ जुलैला डिझनी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. असं असलं तरी अभिनेत्याचे चाहते त्याचा शेवटचा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा याची मागणी करत आहेत. पण निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आधीच स्पष्ट केलं.

आता महाराष्ट्रात होणार अ‍ॅण्टीबॉडीज चाचणी; संसर्गस्थिती समजणार
राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अॅण्टीबॉडीज चाचण्याही करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये किती लोकांना संसर्ग झाला, याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. या चाचण्यांचे दरही माफक असतील. त्यामुळे अधिकाधिक संख्येने त्या करता येतील.

शेअर बाजारात उलथापालथ ; आठवड्याचा शेवट गोड होणार?

जगभर करोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. करोना व्हायरसने अमेरिकेत उच्छाद मांडला आहे. त्यातच बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. त्यांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. या घडामोडी आज आशियातील भांडवली बाजारांवर परिणाम करतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

केईएम डॉक्टरांनी दोन वर्षाच्या बाळाला वाचवले

करोना संसर्गाची धास्ती घेतल्यामुळे प्रत्येक आजार हा करोना असल्याचा गैरसमज सामान्यांच्या मनामध्ये गडद आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्येही अनेकदा इतर आजारांच्या रुग्णांना नाकारले जाते. श्वसननलिकेमध्ये शेंगदाणा अडकल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या दोन वर्षाच्या बाळाचे प्राण केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवले.

पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याचा ठराव

राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने ठराव केला असून, तो केंद्राकडे पाठवणार आहे. असा ठराव करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑगस्टमध्ये नियोजित आहे. मात्र, हे विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासाला लागल्यावर राज्यातील रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्सची कमतरता जाणवेल. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा ठराव केला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona test of air passengers: विमानात चढण्याआधी होणार करोना चाचणी – air passengers able to corona test before boarding the plane for going out...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना आता विमानात चढण्याआधीच करोना चाचणी करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सुविधा उभी...

लाल सोने नजरकैदेत!

टीम मटा केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन व किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टनाची मर्यादा ठरवून दिल्याने व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे...

package for marathwada roads: मराठवाड्यातील रस्त्यांसाठी ५५० कोटी रुपये – 550 crore rupees for marathwada roads from flood relief package says public works minister...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीने शेती, फळबागा, पिके, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा हजार कोटींचे पॅकेज नुकसानीतून...

Recent Comments