Home देश Marathi Headlines in Brief: Top headlines in Brief: राज ठाकरेंच्या घरात करोनाचा...

Marathi Headlines in Brief: Top headlines in Brief: राज ठाकरेंच्या घरात करोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्यांना लागण – 27 june 2020: todays important marathi news round up on maharashtra times


राज ठाकरेंच्या घरात करोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्यांना लागण

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. या दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा महत्त्वाचा खुलासा!

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंच झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांनीही त्यांचा तपास आणि चौकशी सुरू ठेवली आहे. या प्रकरणी आता आणखी एक महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे.

फोनवर तुम्ही कधी-काय पाहतात, गुगलला असं माहिती होतं

नवी दिल्लीः जर तुम्ही एक अँड्रॉयड युजर्स असाल तर तुम्हाला अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण, कोणीतरी तुमचा स्मार्टफोन ट्रॅक करतोय. हो, हे काम गुगल करतोय. तुम्ही फोनमध्ये कधी काय पाहतात. कोणत्या अॅपचा वापर करीत आहात, कधी आणि कुठे याचा वापर केला आहे, सर्व काही गुगलला माहिती आहे.

चिनी सैनिकांच्या बॅगेत लोखंडी रॉड; घातपाताच्या तयारीनिशीच गस्त

नवी दिल्ली : चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालताना त्यांच्या बॅकपॅकमध्ये लोखंडी रॉड ठेवत असल्याचं दिसून आलं आहे. चीनच्या सैनिकांकडून वारंवार दोन्ही देशातील करारांचं उल्लंघन केलं जात आहे आणि काही चूक झाल्यास भारतावरच आरोप केला जातो, असं जाणकार सांगतात. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने असतात तेव्हाही चीनच्या सैनिकांकडे लोखंडी रॉड असतात. गेल्या आठवड्यातच अरुणाचल प्रदेशात हे दिसून आलं होतं.

चीनने तेव्हाही भारताचा भूभाग बळकावला होता: शरद पवार

सातारा: भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे. १९६२च्या युद्धानंतर चीनने भारताचा ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळालेला नाही, अशी आठवण करून देतानाच राष्ट्राच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत.

भयंकर! विलगीकरण कक्षात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती: करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या युवकाने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या युवकाने विलगीकरण कक्षात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे तीन वाजताच सुमारास घडली. अजमद खाँ सत्तार खाँ (२९) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाउन नाही; अनलॉक करण्यावरच भर!

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार नाही तर आता ‘अनलॉक’च असेल, असे स्पष्टीकरण देत शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा लॉकडाउन होणार असल्याच्या चर्चेवर पडदा टाकला. करोनाची लस येत नाही तोवर राज्यातील जनतेला सुरक्षित वावर, मास्क आणि सॅनिटायजेशन या ‘एसएमएस’ प्रणालीचा अवलंब करूनच साधारण आयुष्य जगावे लागेल, असे त्यांनी सांगितले. राज्यात करोनाच्या चाचण्या हव्या त्या प्रमाणात होत नाहीत आणि मृत्यूदर लपवला जातो, असे आरोप खोडून काढत त्यांनी चाचण्यांच्या आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले.

मान्सून देशभरात दाखल, मात्र मुंबई कोरडीच

मुंबई: भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात पोहोचल्याचे शुक्रवारी जाहीर केले. देशभरात मान्सून पोहोचला तरी महाराष्ट्रात मात्र पावसाचा प्रवास काहीसा रखडलेला आहे. मुंबई देखील पहिल्या पावसाच्या जोरदार सरींनंतर कोरडीच आहे.

खासगी रुग्णालयांना इशारा; करोना मृत्यूची माहिती दडवल्यास कारवाई

मुंबई: रुग्णालयात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती महापालिकेला देण्यासाठी खासगी रुग्णालयांना अंतिम संधी देण्यात आली आहे. २९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माहिती न कळविल्यास साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अन्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Katrina Kaif Covid-19 Test Before Shoot Watch Video – कतरिना कैफने शेअर केली तिची करोना टेस्ट, लवकर सुरू करणार शूटिंग

मुंबई- करोना व्हायरसचा वाढा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. सिनेसृष्टीतही यातून सुटली नाही. अनेक निर्बंधासह शूटिंगचं काम तातडीने बंद...

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments