Home देश marathi news in brief: Top News in Brief: आता प्रत्येक रुग्णालयात CCTV;...

marathi news in brief: Top News in Brief: आता प्रत्येक रुग्णालयात CCTV; नातलग रुग्णांना पाहू शकणार – 2 july 2020: todays important marathi news round up on maharashtra times


आता प्रत्येक रुग्णालयात सीसीटीव्ही; नातेवाईक करोना रुग्णांना पाहू शकणार

मुंबई: रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांना आता नातेवाईकही पाहू शकणार आहेत. रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून त्याद्वारे नातेवाईकांना आपल्या रुग्णांना पाहणं शक्य होणार आहे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच तशी माहिती दिली.

मुंबईत दोन दिवस मुसळ’धार’; घरातच थांबा; पोलिसांच्या सूचना

मुंबई: उद्या शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत जोरदार ते अति जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे हे दोन दिवस कारण नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील काही भागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.

पत्नीच्या अपमानाचा सूड; किम जोंग यांनी बॉम्बने उडवले ऑफिस

सोल: काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडले जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती. उत्तर कोरियाने सीमेवरील दक्षिण कोरियाच्या संपर्क कार्यालयावर बॉम्ब टाकून ते उडवून दिले. उत्तर कोरियाने केलेल्या या कारवाईचे कारण समोर आलें असून किम यांच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीत केल्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याची चर्चा आहे.

सुशांतसिंह आत्महत्या: भन्साळी आणि कंगनाचीही होणार चौकशी

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी पोलिसांनी त्यांचा तपास आणि चौकशी सुरू ठेवली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३० जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यात सुशांतचे मित्र, कुटुंबिय, मॅनेजर आणि सिनेसृष्टीतील इतर काही जणांचा समावेश आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाही आणि त्याच्यासोबत करण्यात आलेला भेदभाव ही कारणं देखील जबाबदार असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता अभिनेत्री कंगना रनौट, निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि शेखर कपूर यांची चौकशी करण्यात येणार आहे.

मुंबई विमानतळ विकासात घोटाळा; सीबीआयची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai International Airport Limited) विकासात ७०५ कोटींचा घोटाळा झाल्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) आज धडक कारवाई केली आहे. मुंबईत विमानतळाचा विकास आणि व्यवस्थापन करणाऱ्या जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीजचे (GVK) अध्यक्ष जी. वेंकट कृष्णा रेड्डी आणि त्यांचे चिरंजीव संजय रेड्डी यांच्यासह एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ इंडियाचे काही अधिकारी आणि नऊ कंपन्यांविरोधात ‘सीबीआय’ने गुन्हा दाखल केला आहे.

‘गांधी कुटुंबावरची संकट संपलेली नाहीत; त्यांना आजही धोका’

मुंबई: ‘प्रियांका गांधी यांची सुरक्षा आणि आता राहतं घर काढून घेणं हे दुर्दैवी आहे. प्रियांका गांधी यांनी स्वत:ची आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आहे. आजही त्यांच्या कुटुंबाला धोका आहे. असं असताना केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे,’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर केला आहे.

२०११चा वर्ल्ड कप भारताला विकला; संगकाराला समन्स!

कोलंबो: २०११ साली भारतात झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना फिक्स झाला होता. या प्रकरणी श्रीलंकेत सुरू असेलल्या तपास पथकाने माजी कर्णधार कुमार संगकारा याला समन्स बजावले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ विकेटनी पराभव करत विजेतेपद मिळवले होते. भारताच्या या विजेतेपदावर श्रीलंकेच्या माजी क्रीडमंत्र्यांनी खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.

‘हिंदीला राष्ट्रभाषा मानणं म्हणजे आत्मनाश करून घेण्यासारखं’

पुणे: ‘हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्य करणं म्हणजे राजस्थानी व काही अंशी पंजाबीसारखा आत्मनाश करून घेण्यासारखे आहे. हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून कदापिही मान्यता देऊ नये. शहाणे लोक व शहाणे राज्यकर्ते ती कधीच देणार नाहीत,’ असं परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

देसी TikTok ‘चिंगारी’ची वेबसाईट हॅक, कंपनी म्हणतेय….

नवी दिल्लीः भारत सरकारकडून ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या यादीत शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅपच्या जागी आता इंडियन अॅप्स वेगाने प्रसिद्ध होत आहेत. यातील एक म्हणजे चिंगारी अॅपची वेबसाईट सोबत छेडछाड झाल्याचा आणि हॅकिंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. चिंगारी अॅपला ऑपरेट करणारी कंपनी Globussoft ची वेबसाईटच्या कोड्स मध्ये बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मी सुद्धा घराणेशाहीचा बळी- सैफ अली खान

मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत बी-टाउनमधून कंगना रणौत आणि सिनेसृष्टीतील काही सेलिब्रिटी याबद्दल बोलताना पाहायला मिळत होते. पण आता मात्र अनेक स्टार कलाकारांनीही याबद्दल बोलण्याचं ठरवलं असल्याचं दिसत आहे. बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने याविषयी अनेक धक्कादाय विधानं केली आहेत.

सोने झळाळी ; सराफा बाजारात गाठला ४९ हजारांचा पल्ला

मुंबई : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी देशात सोन्याचा भाव विक्रमी सस्तरावर गेला आहे. बुधवारी दिल्लीत सोने १० ग्रॅमला ४९००० रुपयांवर गेले. तर चांदीने किलोला ५०९०० रुपयांपर्यंत मजल मारली आहे. कमॉडिटी बाजारात सोने प्रती दहा ग्रॅम ४८९८२ रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याने १८०७ डॉलर प्रती औंस इतका स्तर गाठला आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच सोने १८०० डॉलरवर गेले आहे.

करोना रुग्णसंख्या ६ लाखांवर; ५ दिवसांत वाढले १ लाख रुग्ण
नवी दिल्लीः देशातील करोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनाचे २४४२ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे दिल्लीतील करोना रुग्णांची एकूण संख्याही ८९ हजारांवर गेली आहे. तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५५३७ नवे रुग्ण आढळले आहेत.

इंधन दरवाढीला लगाम; सलग तिसऱ्या दिवशी किंमती ‘जैसे थे’

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांच्या दर पत्रकानुसार गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ असून डिझेल दर ७८.८३ रुपयांवर कायम आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.५३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेल ७७.७२ रुपये आणि कोलकात्यात ७५.६४ रुपये झाले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

farmers protest Delhi: farmers protest delhi : दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसाचार; अभिनेता दीप सिद्धू चर्चेत – farmers protest delhi yogendra yadav and gurnam singh...

नवी दिल्लीः दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारामागे ( violence in farmers protest ) पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू ( deep sidhu...

Recent Comments