Home मनोरंजन marati movies 2021: मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार नवी केमेस्ट्री; 'या' जोड्या पहिल्यादाच...

marati movies 2021: मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार नवी केमेस्ट्री; ‘या’ जोड्या पहिल्यादाच दिसणार एकत्र – upcoming fresh pairs in marathi cinema you’ll get to watch on the big screen in 2021


मुंबई टाइम्स टीम

गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मोजकेच सिनेमे प्रदर्शित झाले. पुढे मार्चच्या मध्यानंतर लॉकडाउनच्या दिवसात एकही सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. ओटीटीवर देखील एखाद दुसरा नवा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. चित्रपट आणि प्रेक्षकांची ही ताटातूट लवकर संपणार अशी आशा आहे. येत्या मार्च महिन्यापासून चित्रपटगृहं पुन्हा मराठी सिनेमांनी बहरणार आहेत. मराठी सिनेमांचं लाजवाब कथानक हे त्याचं ‘युएसपी’ असतंच पण आता त्याच्याच साथीला कलाकारांच्या नव्याकोऱ्या जोड्यांची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पहिल्यांदाच एकत्र काम करत असल्यामुळे या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री नक्कीच प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरेल. संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘लक डाऊन’ सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता अंकुश चौधरी एकत्र दिसणार आहेत. दोघंही स्टाइल आयकॉन म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. ही स्टाइलिस्ट जोडी सिनेमाच्या पडद्यावर एकत्र येऊन चार चाँद लावेल यात शंका नाही. तसंच दुसरीकडे ‘अनन्या’ या नाटकावर आधारित सिनेमात अमेय वाघ आणि ऋता दुर्गुळे ही वेगळी जोडी दिसणार आहे. प्रेक्षकांना सिनेमांकडे आकर्षित करायचं असेल तर त्याची कथा तर उत्तम हवीच पण त्याचं सादरीकरणही चांगलं असायला हवं. म्हणूनच चित्रपटकर्ते आता त्यातल्या मुख्य जोड्यांवर लक्ष देत प्रयोग करू लागले आहेत. म्हणूनच यापूर्वी कधीच एकत्र काम न केलेल्या कलाकारांच्या जोड्या हा नवा ट्रेंड दिसू लागलाय, असं सिनेवर्तुळातील जाणकार सांगतात.
मुलीचा बाप झालो… लेकीचा फोटो पोस्ट करत अंकुर वाढवेनं शेअर केली गोड बातमी
‘डेट भेट’ या आगामी सिनेमात सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर यांची हट के जोडी आहे. ललित प्रभाकर आणि सई ताम्हणकर ही जोडी दोन सिनेमात दिसणार आहे. ‘कलरफुल’ आणि ‘मीडियम स्पाइसी’ या दोन चित्रपटात ही जोडी दिसेल. यापैकी ‘मीडियम स्पाइसी’मध्ये पर्ण पेठेही आहे. त्यामुळे ललित आणि पर्ण ही सुद्धा एक नवी जोडीच म्हणावी लागेल. ‘गोदावरी’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. दिग्दर्शक निखिल महाजन बऱ्याच वर्षांनी चित्रपट करतोय. यामध्ये गौरी नलावडे आणि जितेंद्र जोशी ही नवी कोरी जोडी दिसून येईल. नव्या कोऱ्या जोड्यांचा हा ट्रेंड प्रेक्षकांना किती भावेल हे लवकरच समजेल.

जुन्या जोड्या पुन्हा एकदा
काही जुन्या जोड्या नव्या केमिस्ट्रीसह आगामी सिनेमात दिसणार आहेत. यापूर्वी ‘सतरंगी रे’ या सिनेमात एकत्र दिसलेली अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची जोडी पुन्हा एकदा ‘चंद्रमुखी’च्या निमित्तानं एकत्र झळकणार आहे. तर ‘मन फकिरा’मध्ये दिसलेली सायली संजीव आणि सुव्रत जोशीही जोडी आता ‘गोष्ट एका पैठणीची’मध्येही दिसेल. पूजा सावंत आणि अंकुश चौधरी यांनी ‘दगडी चाळ’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही हीच जोडी दिसणार आहे.
Bigg Boss 14 ची टॅलेन्ट मॅनेजर पिस्ता धाकडचा अपघाती मृत्यू, सेटच्या बाहेरच झाला मोठा अपघात
दिसेल नवी केमिस्ट्री
कलरफुल – सई ताम्हणकर, ललित प्रभाकर

झोंबिवली – वैदेही परशुरामी, अमेय वाघ, ललित प्रभाकर

अनन्या – ऋता दुर्गुळे, अमेय वाघ

मीडियम स्पायसी – सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर

लक डाऊन – प्राजक्ता माळी, अंकुश चौधरी

डेट भेट – सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर

जून – नेहा पेंडसे, सिद्धार्थ मेनन

गोदावरी – गौरी नलावडे, जितेंद्र जोशी

झिम्मा – सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर

चंद्रमुखी – अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments