Home शहरं पुणे marriage function: विवाह समारंभांना सशर्त परवानगी - conditional permission for wedding ceremonies

marriage function: विवाह समारंभांना सशर्त परवानगी – conditional permission for wedding ceremonies


म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शहर आणि जिल्ह्यात ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, विवाह समारंभ हे खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरातच करण्याची अट घालण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ५० लोकांच्या उपस्थितीत सुरक्षित वावर राखून विवाह समारंभ साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राम यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

विवाह समारंभासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विवाह समारंभाला उपस्थित असलेल्या सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विवाह समारंभाच्या ठिकाणी थुंकण्यास; तसेच गुटखा, पान, तंबाखू खाण्यास व मद्यपानास मनाई असणार आहे. विवाह समारंभाची जागा आणि वारंवार हाताळले जाणारे भाग निर्जंतुक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विवाह समारंभाच्या आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे, सॅनिटायझर याची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित मंगल कार्यालय किंवा हॉलच्या व्यवस्थापकांकडे देण्यात आली आहे. सुरक्षित वावराचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मंगल कार्यालय किंवा हॉल बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राम यांनी दिला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : मुंबईसाठी आरोग्य विभागाचं मोठं पाऊल, आता 3 ऐवजी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण | News

7:04 am (IST) विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस चर्चेला मुख्यमंत्री उद्धव...

illegal parking in mumbai: अवैध पार्किंग जोरात – mumbai traffic police not strict action against illegal road parking in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेने आपल्या वाहनतळांच्या परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले. मात्र पोलिसांनी अद्याप ही कारवाई सुरू केलेली नाही....

Recent Comments