Home क्रीडा Mashrafe Mortaza: धक्कादायक... गरजूंना मदत करणाऱ्या क्रिकेटपटूलाच झाला करोना - bangladesh legend...

Mashrafe Mortaza: धक्कादायक… गरजूंना मदत करणाऱ्या क्रिकेटपटूलाच झाला करोना – bangladesh legend mashrafe mortaza tests positive for covid-19


करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरु असताना गरजू लोकांना मदत करणाऱ्या एका क्रिकेटपटूलाच आता करोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. करोनाग्रस्तांचा मदतीसाठी त्याने आपला अर्धा पगार दान केला होता. त्याचबरोबर काही गरजू व्यक्तींनाही त्याने मदत केली होती.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर आज बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा एक भाग असलेला नफीझ इक्बालला करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता तर एका माजी कर्णधाराला करोना झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

वाचा-धक्कादायक, सौरव गांगुलीच्या कुटुंबियांना झाली करोनाची बाधा

बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफी मोर्तझाला करोनाची बाधा झाल्याचे आता समोर आले आहे. दोन दिवसांपासून त्याला ताप येत होता. त्यानंतर त्याची करोना चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली असून मश्रफीला करोना झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मश्रफीची सासू आणि भाची यांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते.

मश्रफीला करोना झाल्याचे त्याचे बंधू मोर्सालिन मोर्तझा यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, ” मश्रफीला दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्याची करोना चाचणी करण्याचे आम्ही ठरवले. मश्रफीची करोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे आणि त्याच्यावर आम्ही घरीच उपचार करणार आहोत. मश्रफी लवकर बरा व्हावा, यासाठी तुम्ही प्रार्थना करा.”

करोना झालेली आजची पहिली व्यक्ती आहे बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू नफीस इक्बाल. नफीस हा बांगलादेश संघाचा कर्णधार तमीम इक्बालचा भाऊ आहे. आता नफीसला करोना झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या संपर्कातील लोकांचीही करोना चाचणी करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला नफिसची प्रकृती सुधारत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांची चिंता कमी झाली आहे.

वाचा-विराटची पत्नी अनुष्का प्रेग्नेंट असल्याचे फोटो व्हायरल, जाणून घ्या फॅक्ट चेक…

नफीस हा मुस्ताफिझूरमुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक भाग झाला होता. मुस्ताफिझूरला बरीच भाषेची अडचण येत होती. त्यामुळे नफीस मुस्ताफिझूरसाठी भाषांतरकार म्हणून काम करत होता. नफीसने २००३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००५ साली त्याने १२१ धावांची खेळी साकारली होती, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. नफीस २००६ नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

e vehicle may be delay due to corona: करोनाचे संकट; ई-वाहनांना लागणार ब्रेक – e-vehicles will be delayed

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन २०३० पर्यंत संपूर्ण देशात ई-वाहने रस्त्यांवर चालवली जातील, हा केंद्र सरकारचा संकल्प अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचे संकट...

Marathwada : २४ तासांत आढळले ५८५ नवे करोनाग्रस्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांच्या संख्या कमी होत असून, गुरुवारी (२३ ऑक्टोबर) विभागाातील आठही जिल्ह्यांत ५८६ नवीन बाधित आढळले...

Recent Comments