Home देश पैसा पैसा MCX launched Gold Mini Options: सेबीचा हिरवा कंदील ; कमॉडिटी बाजारात आता...

MCX launched Gold Mini Options: सेबीचा हिरवा कंदील ; कमॉडिटी बाजारात आता गोल्ड मिनीचे सौदे – sebi gives nod to mcx for gold and silver mini option


मुंबई : नुकताच सेबीने ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’ या दोन शेअर बाजारांना गोल्ड मिनी आणि सिव्हर मिनीला आॅप्शन परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये गोल्ड मिनी आणि सिल्व्हर मिनी आॅप्शनमध्ये ट्रेडिंग केले जाते. आता मल्टी कमॉडिटी एक्सचेंजसुद्धा गोल्ड मिनी आणि सिल्व्हर मिनीचे ट्रेड आयोजित करणार आहे. MCX वर ऑगस्टची मुदतपूर्ती असणारे गोल्ड मिनी आणि सिव्हर मिनी सादर केले जातील. यात गोल्ड मिनी कॉन्ट्रॅक्ट्स १०० ग्रॅमचे असतील. तर सिल्व्हर मिनी कॉन्ट्रॅक्ट्स ५ किलोचे असतील. प्रत्येक मिनी फ्युचर्ससाठी १०० स्ट्राइक प्राइस असणार आहेत. ही स्ट्राइक प्राइस प्रत्येक गुंतवणूकदाराच्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असणार आहे.

‘MCX’वर गोल्ड आणि सिव्हर मिनी फ्युचर्सचे सध्या सौदे सुरु आहेत. सेबीने २०१७ मध्ये MCX गोल्ड ऑप्शन सुरु करण्यास परवानगी दिली होती. यात ट्रेडिंग एक किलो सोन्यासह सुरू केले जाते. त्यासाठी सुरुवातीला गुंतवणूकदारांना अतिशय कमी खर्च येतो. त्यानंतर सोन्याच्या भावातील चढउतारांप्रमाणे गुंतवणुकीवर परतावा मिळणार आहे. हे वायदे सुविहित सुरू राहावेत, यासाठी ‘एमसीएक्स’ने आवश्यक त्या तंत्रज्ञानाची सिद्धताही केली आहे.

करोनाची पिडा दोन वर्षे; भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान
सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ‘एमसीएक्स’मधील सोन्याचे वायदे हा चांगला पर्याय ठरणार आहे. गुंतवणूकदार कमी गुंतवणूक करूनही चांगला परतावा प्राप्त करू शकतात. योग्य वेळी योग्य ती सावधानगिरी बाळगल्यास उत्तम परतावा प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना ऑप्शनची खरेदी अथवा विक्री करावी लागणार आहे.त्यामुळे निर्णय घेताना सावधानगिरी बाळगण्याची गरज आहे.

‘MCX’चे नऊ कर्मचारी करोनामुक्त
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमधील नऊ कर्मचारी करोनामुक्त झाले असल्याची माहिती बाजाराने ‘MCX’ ने दिली आहे. लॉकडाउनमध्ये ‘MCX’च्या कार्यालयातील ३० पैकी नऊ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर हे सर्व कर्मचारी पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले असे ‘MCX’ने म्हटलं आहे. ‘MCX’चे दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आता रोटेशन पद्धतीने कर्मचारी काम करत आहेत, असे कमॉडिटी बाजाराने म्हटलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

madhurta deshmukh: घरबसल्या गोष्टी ऐका आजी-आजोबांकडून – storyteller madhurata deshmukh is present stories for children under spin a yarn india using youtube and facebook

हर्षल मळेकर, मुंबईआजी-आजोबांच्या कुशीत शिरुन कोल्होबा, कावळा, सिंह-उंदिर यांच्या तसेच राम-कृष्णाच्या, बिरबलाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे हे भाग्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्ली फार...

Recent Comments