Home शहरं औरंगाबाद medha patkar: हे सरकार खोटं बोलत नाही, मुख्यमंत्रीही उद्धट नाहीत: मेधा पाटकर...

medha patkar: हे सरकार खोटं बोलत नाही, मुख्यमंत्रीही उद्धट नाहीत: मेधा पाटकर – medha patkar praises cm uddhav thackeray and maharashtra government


उस्मानाबाद: ‘सध्याचे राज्यातले सरकार खोटी आश्वासनं देत नाही आणि मुख्यमंत्रीही अॅरोगंट ( उद्धट ) नाहीत’ अशा अत्यंत सूचक शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाचे तसेच ‘ महाविकास आघाडी सरकार ‘च्या कारभाराचे कौतुक केले.

वाचा: नातू गमावल्यानंतरही आजीने राखले समाजभान; गृहमंत्री झाले नतमस्तक

उस्मानाबाद दौऱ्यावर आलेल्या मेधा पाटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील करोना संसर्ग आणि त्याअनुशंगाने सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना याविषयी त्यांनी अत्यंत नेमक्या शब्दांत आपली मते मांडली. करोनासारख्या महासंकटात सरकार व प्रशासन अत्यंत योग्यप्रकारे स्थिती हाताळत असल्याचे त्या म्हणाल्या. करोना संसर्गाशी सध्या प्रशासन झुंजत आहे. या स्थितीत सरकारने कायद्यानुसार आपली जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी सरकारने केलेले आवाहन जनतेनेही ऐकावे, असे पाटकर यांनी नमूद केले.

वाचा: करोनाग्रस्त महाराष्ट्राला मोठा दिलासा; रुग्णवाढीचे ‘हे’ ताजे आकडे पाहाच

‘हे संवादी सरकार असून करोना सारख्या संकटात आक्रस्ताळेपणा न दाखवता संयमाने परिस्थिती हाताळली जात आहे’, असे नमूद करत पाटकर यांनी सरकारचे कौतुक केले. सध्याचे राज्यातले सरकार खोटी आश्वासने देत नाही किंवा मुख्यमंत्रीही ‘अॅरोगंट’ नाहीत. अनेक वर्षांनंतर राज्याला असे सरकार मिळाले आहे. मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधताना आश्वासक आणि ठाम वाटत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेलाही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, असे सांगतानाच हे संवादशील सरकार असल्याने ते संवेदनशील असेल ही अपेक्षा असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले.

दरम्यान, राज्य सरकारचं कौतुक करताना मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारला मात्र लक्ष्य केले. केंद्राच्या धोरणांवर त्यांनी सडकून टीका केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कारस्थानांची सत्यकथा

विवेक गोविलकर यांचे '' हे पुस्तक म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना आहे. वॉल स्ट्रीट जर्नलसाठी काम करणाऱ्या या लेखकाला दोनदा शोध पत्रकारितेचा...

tb hospital mumbai: रुग्णालयात शौचालयात रुग्णाचा कुजलेला मृतदेह – 27 years tb patient body was found in toilet in a tb hospital mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईशिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयात रविवारी रुग्णाचा कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, तसेच मृतदेह...

Recent Comments