Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल Micromax: लावा आणि कार्बन सुद्धा घेऊन येतेय स्वस्त स्मार्टफोन - micromax, karbonn...

Micromax: लावा आणि कार्बन सुद्धा घेऊन येतेय स्वस्त स्मार्टफोन – micromax, karbonn and lava to soon launch entry-level and mid-range smartphones in india


नवी दिल्लीःशाओमी, ओप्पो आणि विवो यासारख्या चीनी फोन कंपन्यांची एन्ट्रीनंतर गेल्या काही वर्षात मागे पडलेल्या भारतीय फोन कंपन्या आता पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. होम बेस्ड हँडसेट निर्माता मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन देशातील चीन विरोधी उद्रेकाचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे चिनी स्मार्टफोन ब्रँड्स सुद्धा भारतातील आपली जाहिरात आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलू शकते.

वाचाःTikTok ला जबरदस्त टक्कर देताहेत हे भारतीय अॅप्स

येताहेत १० हजारांपेक्षा स्वस्तातील फोन
सध्या फीचर सेगमेंटमध्ये काम करीत असलेली Karbonn मोबाइल स्मार्टफोन बाजाराता पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ।ETTelecom च्या एका रिपोर्टनुसार, कार्बन मोबाइलचे कार्यकारी संचालक शशीन देवसरे यांनी सांगितले की, कंपनी १० हजार रुपयांच्या सेगमेंटमधील स्मार्टफोन घेऊन येवू शकते. याआधी मायक्रोमॅक्सने सुद्धा मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर बजेट स्मार्टफोन घेऊन येण्याची घोषणा केली आहे. कार्बनने भारतात आधी ८ लाख ते १० लाख फीचर फोन विकले आहे.

वाचाः५० हून अधिक चायनीज अॅप्स ‘धोकादायक’, भारतीयांना अलर्ट


लावा सुद्धा तयारीत

फीचर फोन आणि स्मार्टफोन दोन्ही सेगमेंटमध्ये काम करीत आहे. लावा मोबाइल सुद्धा नवीन दोन फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. लावा इंटरनॅशनलचे सीएमडी हरी ओम राय यांनी सांगितले की, भारतात मोबाइल फोन मॅन्यूकॅक्चरिंग आणि डिझाईन मध्ये नंबर १ देश बनण्याची तयारी करीत आहे. आम्ही विश्व स्तरांवर विजय मिळवणे हे भारताचा गौरव वाढवण्यासाठी स्वतःला तयार करीत आहे. हे एक मॅराथन आहे. स्पिंट नाही. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, लावा जुलै मध्ये दोन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. यात एक स्मार्टफोन Lava Z66 असणार आहे. यात 1.20GHz ऑक्टाकोर प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि अँड्रॉयड १० सोबत येईल.

वाचाः मायक्रोमॅक्स जबरदस्त पुनरागमनच्या तयारीत, ३ फोन घेऊन येतेय

काउंटर पॉइंट रिसर्च नुसार, जानेवारी ते मार्च पर्यंत ८१ टक्के स्मार्टफोनच्या शीपमेंटमध्ये चिनी स्मार्टफोन कंपन्यांची आहे. तर मायक्रोमॅक्स आणि लावा यासारख्या भारतीय ब्रँड्सच्या कंपन्यांची भागीदारी केवळ १ टक्के आहे. काउंटर पॉइंट रिसर्चचे असोशियट डायरेक्टर तरुण पाठक यांनी सांगितले, जर स्थानिक कंपन्या #vocalforlocal पिचला पकडत असेल तर त्या कंपन्या जोरदार पुनरागमन करू शकतात.

वाचाः चीनच्या हॅकर्सचा प्लान, फार्मा आणि टेलिकॉम कंपन्यांवर करु शकतात अटॅक

वाचाःचायनीज अॅपमुळे कोणता आहे धोका, जाणून घ्या

वाचाः विना रिचार्ज मिळवा ५० रुपये, BSNLची ऑफरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

मास्क न लावणाऱ्यांमुळे वाढू शकतो करोनाचा धोका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गवाढीच्या (उच्चतम बिंदू) महत्त्वाच्या टप्प्यावर मुंबई आली असल्याचे निरीक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केले जात असले तरीही ...

Recent Comments