Home शहरं पुणे migrant labourers: काही राज्यांचा मजुरांना घेण्यास नकार; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे पाऊल -...

migrant labourers: काही राज्यांचा मजुरांना घेण्यास नकार; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे पाऊल – pune migrants: more hurdles in return journey of migrant workers


पुणे: केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार मजुरांना मूळ गावी जाता येणार असले, तरी मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यांचे धोरण वेगळे असून, काही राज्यांनी मजुरांना त्यांच्या राज्यांत घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने परराज्यांतील मजुरांचा परतीचा मार्ग पुन्हा रोखला गेला आहे.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यांतील मजुरांना मूळ गावी जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुसार माहिती संकलित करण्याचे आणि अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुन्हा एकदा मजुरांचा परतीचा मार्ग रोखला गेला आहे. काही राज्यांनी मजुरांना आपल्या राज्यांमध्ये घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्या राज्यांकडून परवानगी मिळाल्याशिवाय शहर आणि जिल्ह्यातील मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये जाता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

घरवापसी: १२११ कामगारांना घेऊन भिवंडी-जयपूर ट्रेन रवाना

‘संबंधित राज्यांकडून परवानगी देण्यात आल्यानंतर मजुरांना त्या राज्यांत पाठविण्याची परवानगी दिली जाईल. तोपर्यंत या नागरिकांनी आहे त्याच ठिकाणी थांबावे’ असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. मजुरांना मूळ गावी जाण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे सहा हजार मजुरांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. तसेच या मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यावर निर्बंध

‘परराज्यांमध्ये जाणाऱ्या कामगार विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी करु नये. परराज्यांत शंभर किंवा दोनशे अशा संख्येत गटाने जाणाऱ्या कामगारांची नजीकच्या ठिकाणी प्रशासनामार्फत वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. दवाखान्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्या ठिकाणी गर्दी करणे, हे धोक्याचे आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी याबाबत खबरदारी घेतली पाहिजे’ असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

‘मध्य

प्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यांचे धोरण वेगवेगळे आहे. काही राज्यांनी नागरिकांना त्यांच्या राज्यांत घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे परवानगी देणाऱ्या राज्यांतील नागरिकांनाच त्यांच्या राज्यांत पाठविले जाणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांना आहे त्याच ठिकाणी रहावे लागणार आहे’ – नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे

राज्यात करोनाचे आज ३५ बळी; २४ तासांत ७७१ नवीन रुग्णSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Kangana Ranaut: कंगनाला २२ मार्चपर्यंत अटक करू नका; हायकोर्टाचे निर्देश – kangana ranout and rangoli chandel maintained interim protection from arrest

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेत्री कंगना रणौट व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी...

Iqbal Mirchi: मुंबई : मिर्चीचे कुटुंबीयही ‘परागंदा आर्थिक गुन्हेगार’ – court declares iqbal mirchi’s family members fugitive economic offenders

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दिवंगत निकटवर्तीय व कुख्यात गँगस्टर इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्ची याची पत्नी हाजरा तसेच मुले आसिफ व...

Recent Comments