Home देश migrant workers: मजुरांकडून तिकीटाची वसुली केली नाही, केंद्राचे स्पष्टीकरण - never talked...

migrant workers: मजुरांकडून तिकीटाची वसुली केली नाही, केंद्राचे स्पष्टीकरण – never talked about charging migrant workers 85 percent fare borne by railways and 15 percent by state government says center


नवी दिल्लीः स्थलांतरीत मजुरांना विशेष रेल्वे गाड्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यात येत आहे. पण या मजुरांकडून केंद्र सरकार तिकीटाचे पैसे घेत असल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. तर केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. स्थलांतरीत मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे मागितलेच नाही. प्रवाशांच्या तिकीटाचा ८५ टक्के खर्च रेल्वेकडून करण्यात येत आहे. तर उर्वरीत खर्च हा राज्य सरकार करत आहे. यामुळे मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे घेत असल्याचा आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे.

एक-दोन राज्य वगळता इतर राज्य सरकारांशी समन्वय साधून विविध राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना रेल्वेद्वारे त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे. करोना व्हायरससारख्या संसर्गजन्य परिस्थितीत कुणीही असो मजूर असो की कामगार यांनी आहे त्या ठिकाणीच राहिलं पाहिलं. त्यांची व्यवस्था केली गेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सर्व नियम पाळले गेले पाहिजे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. मजुरांना निशुल्क का सोडण्यात येत नाहीए? यावर अग्रवाल यांनी वरील उत्तर दिलं.

काही राज्यांनी स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली होती. त्यांनी काही कारणंही त्यासाठी दिली होती. यामुळे केंद्र सरकारने विशेष रेल्वे चालवण्याची परवानगी राज्यांना दिली. यासाठी रेल्वेने किंवा केंद्र सरकारने स्थलांतरीत मजुरांकडे तिकीटाचे पैसे मागितलेच नाही. ज्या मजुरांना विशेष रेल्वे गाड्यांनी त्यांच्या गावी सोडण्यात येत आहे त्यांच्या तिकीटाचा ८५ टक्के खर्च हा रेल्वे उचलत आहे आणि १५ टक्के खर्च राज्य सरकार करत आहे, असं लव अग्रवाल म्हणाले.

लखनऊ स्थानकात आनंदोत्सव!

मजुरांच्या तिकीटाचा खर्च काँग्रेस करणार

स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार असल्याचं जाहीर करत पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला. परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात मोफत आणण्यात आलं. पण गरीब कामगारांकडून मात्र रेल्वे तिकीटाचे पैसे वसूल केले जात आहेत, असा आरोप सोनिया गांधींनी केला. प्रत्येक गरजवंत श्रमिक आणि कामगाराचा घरी परतण्याचा रेल्वे खर्च काँग्रेस करेल, असं सोनिया गांधींनी सांगितलं. यावरून राजकारण सुरू झालंय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

'सुपर संभाजीनगर'च्या परवानगीची चौकशी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहरात '' चे डिस्प्ले लावण्याची परवानगी देण्यात आली आहे का याची चौकशी केली जाईल,...

virat kohli: IND vs ENG : विराट कोहलीला मिळाले जीवदान, पाहा कोणी सोडला सोपा झेल… – ind vs eng : indian captain virat kohli’s...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्याच दिवशीच जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. विराटचा सोपा झेल यावेळी इंग्लंडच्या खेळाडूने सोडल्याचे पाहायला...

प्रियांका चोप्रा: पलटवार असावा तर असा! लोकांनी उडवली ड्रेसची थट्टा, पाहा प्रियांका चोप्राचं उत्तर – priyanka chopra tweet her viral memes on her dress...

हायलाइट्स:प्रियांका चोप्रा आणि फॅशन याजणू एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रियांकाच्या ड्रेसवर व्हायरल होत आहेत मीम्सस्वतः प्रियांकानेही घेतला या मीम्सचा आनंदमुंबई- प्रियांका चोप्राचा हात फॅशन...

kapil sibal congress leader: ‘उत्तर-दक्षिण’ वक्तव्यावरून राहुल गांधी वादात; कपिल सिब्बलांनी दिला सल्ला, म्हणाले… – congress leader kapil sibal speaks on rahul gandhis statement...

नवी दिल्लीः कॉंग्रेस नेते राहुल गांधी ( rahul gandhi ) यांनी उत्तर व दक्षिण भारतातील राजकारणावर केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांना आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ...

Recent Comments