Home शहरं कोल्हापूर milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी...

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna dudh sangh


म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. यंदा जिल्ह्यातील गोकुळ, वारणेसह अनेक संघानी तब्बल शंभर कोटीपेक्षा अधिक बोनस दिल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला गतवर्षी महापूराने फार मोठा तडाखा दिला. ८८ हजार ४३९ हेक्टर शेती पूरबाधित झाल्याने शेतीचे पंधराशे कोटीपेक्षा अधिक नुकसान झाले. ऊस, सोयाबीन, भुईमूग यासह अनेक पिकांना मोठा फटका बसला. सरकारने काही प्रमाणात मदत केली, पण नुकसानीच्या प्रमाणात ती फारच तुटपूंजी होती. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पीके चांगली आली होती. बहरेली पीके काढणीला आली असतानाच परतीच्या पावसाने झोपडून काढले. आठ ते दहा दिवस कोसळलेल्या पावसाने काही पीके कुजली, तर काहींना कोंब आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच बिघडले. हातातोंडाशी आलेली पीके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवाळी तोंडावर असतानाच परतीच्या पावसाने सारा उत्साहावर पाणी फिरवले.

परतीच्या पावसाच्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ धावून आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात रोज किमान पंधरा लाख लिटर दूध संकलन होते. यातील बहुतांशी दूध मुंबईला पाठवले जाते. गोकुळ, वारणा, शाहू, प्रतिभा, स्वाभिमानी यासह अनेक दूध संघाच्या वतीने शेतकऱ्यांचे दूध संकलन केले जाते. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा या संघाकडून तब्बल १०६ कोटीचा बोनस दिला जाणार आहे. यामध्ये गोकुळच्या वतीने ७६ कोटी तर वारणा संघांच्यावतीने ३० कोटी देण्यात येणार आहेत. इतर दूध संघही बोनस देणार आहेत. दसऱ्यालाच हा बोनस मिळणार असल्याने दसरा आणि दिवाळीचाही गोडवा वाढणार आहे. यंदा जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. एफआरपी चांगला मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होण्याची चिन्हे आहेत.

मागील वर्षाच्‍या महापूरामुळे शेतकरी अडचणीत आलेला होता. तसेच सगळीकडे पसरत चाललेल्‍या करोना संसर्गाच्‍या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योगधंदे,साखर कारखाने अडचणीत असताना गोकुळ दूध संघाने खर्चात काटकसर करुन वर्षभर राज्‍यातील इतर संघांच्‍या तुलनेत जास्‍त दर दिलेला आहे. परतीच्या पावसाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना ७१ कोटीचा बोनस दिला जाणार आहे.
– रवींद्र आपटे, अध्यक्ष, गोकुळ दूध संघ

नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. म्हैस दुधासाठी प्रतिलिटर दोन रूपये १० पैसे हा बोनस असेल.
– विनय कोरे, अध्यक्ष, वारणा दूध संघSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती धुरा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड प्रभावित राज्यांतून महाराष्ट्रात हवाई आणि रेल्वेमार्गाने प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणीचे प्रमाणपत्र सक्तीचे असून, संसर्ग नसलेल्या नागरिकांनाच राज्यात प्रवेशास...

Maharashtra govt employees strike: Maharashtra Strike: संपाआधीच ठाकरे सरकारचा इशारा; ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई – will take action against employees if they go...

मुंबई: राज्य शासकीय कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात उद्या (गुरुवारी) संपावर जात आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी तशी नोटीस शासनाला दिली आहे. त्या...

aurangabad News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरीच मतदानाची सोय – senior citizens, disabled people can vote at home

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना 'मोबाइल पोलिंग बुथ'च्या माध्यमातून त्यांच्या घरीच गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा...

Recent Comments