Home महाराष्ट्र mira- bhaynder lockdown: mira- bhaynder lockdown: मीरा- भाईंदरमध्ये पुन्हा लॉकडाऊन; फक्त 'या'...

mira- bhaynder lockdown: mira- bhaynder lockdown: मीरा- भाईंदरमध्ये पुन्हा लॉकडाऊन; फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू – mira bhayander will be put under lockdown from 1 july to 10 july


ठाणेः राज्यात अनलॉक-२ची घोषणा केली असली तरी अजूनही करोना संसर्गाचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आलेलं दिसत नाहीये. यासाठीच काही मोठ्या शहरातील महानगरपालिकांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मिरा – भाईंदर परिसरात पुन्हा एकदा १० दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. (mira- bhaynder lockdown)

मीरा – भाईंदर महापालिका परिसरात बुधवार संध्याकाळी ५ वाजता ते १० जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन केल्यास पुढील महिन्यात पुन्हा अनलॉक जाहीर करण्यात येईल. अशी माहिती मीरा भाईंदर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

वाचाः पोलिस दलावर करोनाचे संकट; २४ तासांत ६७ करोनाग्रस्तांची नोंद

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये करोनाची लागण झालेले आणखी १२६ रुग्ण सोमवारी आढळले आहेत. त्यामुळे शहरात करोनाबाधितांची संख्या तीन हजार १६५ झाली आहे. त्यापैकी दोन हजार १०३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, १४५ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊन दरम्यान दुकाने, कार्यालये पूर्णपणे बंद राहणार आहेत. फक्त मेडिकल आणि इतर आत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. बेकरी आणि दूध विक्रेत्यांना सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत दुकान सुरु ठेवण्याची मुभा आहे. मात्र इतर दुकाने, सुपर मार्केट, भाजी मंडई, किराणा दुकाने पूर्णपणे बंद राहती. तसंच, किराणा सामान, फळं, भाज्या, मासे, आणि चिकन आणि मटण यावस्तूंना सकाळी ९ ते रात्री ११ दरम्यान घरपोच डिलिव्हरीची सेवा देता येणार आहे. मेडिकल दुकानांनाही सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी सोशल डिस्टनसिंगचं पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

वाचाः टिकटॉकने पीएम केअरला ३० कोटी दिले; हा क्रांतीचा भाग होता का?: काँग्रेस

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच प्रवासाची मुभा असणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसल्यास पोलिसांकडून कारवाईचा ईशाराही देण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

burglary cases in mumbai: मुंबईत वाढल्या घरफोड्या – burglary cases have increased in mumbai after lockdown

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नियंत्रणात असलेल्या मुंबईतील चोऱ्या आणि घरफोड्या पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. लॉकडाउन असल्याने...

Recent Comments