Home संपादकीय missing FaceMask: मास्क न घातल्याने बॉस भडकला, दिव्यांग महिला कर्मचाऱ्याला मारहाण -...

missing FaceMask: मास्क न घातल्याने बॉस भडकला, दिव्यांग महिला कर्मचाऱ्याला मारहाण – woman employee was attacked inside the office by a senior officer for reminding him about his missing facemask


नेल्लोरः करोना व्हायरस संकटात देश अनलॉक होतोय. ऑफिसेस सुरू होत आहेत. पण खबरदारी म्हणून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. मात्र एक अशी घटना समोर आलीय ज्यात एका बॉसने आपल्या ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली. या महिलेने ऑफिसमध्ये मास्क न घातल्यावरून ही मारहाण केली गेली.

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील ही घटना आहे. आंध्र प्रदेश पर्यटन विभागात एक दिव्यांग महिला कॉन्ट्रॅक्टवर नोकरी करते. अनलॉक- १ दरम्यान ही माहिला ऑफिसला गेली. त्यावेळी तिने मास्क घातला नव्हता. हे पाहून उपव्यवस्थापक भास्कर यांनी महिलेला मास्क घालण्यास सांगितले. यावरूनच बॉसने ऑफिसमध्ये सर्वांसमोर महिलेला मारहारण केल्याचा आरोप आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. महिला बसलेल्या विभागात आरोपी अचानक दाखल होतो. त्यानंतर खुर्चीवरून पीडित महिलेला खाली पाडून तिला मारहाण करतो. महिलेला मारहाण होत असताना तिने मास्क घातल्याचं दिसतंय. यावेळी ऑफिसमधील काही जण महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण भडकलेल्या आरोपी अधिकाऱ्याने महिलेला मारहाण केली, असं या व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसतंय.

या घटनेनंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अधिकाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार केली. या घटनेची दखल पर्यटनमंत्री अवंती श्रीनिवास यांनीही घेतली. या प्रकरणी त्यांनी आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिलेत पोलिसांनी २७ जूनला या प्रकरणी एफआयआर दाखल केली होती.

करोनावर लस कधी तयार होणार? PM मोदींनी घेतली महत्वाची बैठक

क्रूरतेचा कळस! रात्रीची झोपमोड होते म्हणून त्याने कुत्र्याच्या पिलाला…

घटनेनंतर आरोपी फरार झाला. पण पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली. अटकेनंतर आरोपीची करोना चाचणी केली गेली. त्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने आरोपीची रवानगी तुरुंगात केलीय. आंध्र प्रदेशातील नेल्लोरच्या सरकारी कार्यालयातील या घटनेचा व्हिडिओ….Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीला नपुसंक करायचं होतं; ‘असा’ उघड झाला पत्नीचा कट – pune plot to make the husband impotent with the help of...

म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनवायचा कट 'ती'ने आखला. मात्र, याचा सुगावा लागताच पतीने पोलिसात धाव घेतली. वारजे माळवाडी येथे...

five trillion economy dream: ‘करोना’चा आघात; ‘पाच ट्रिलियन डॉलर’चे स्वप्न बिकटच – the dream of five trillion dollars economy having major challenges ahead

वृत्तसंस्था, मुंबई : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरवर (५०० लाख कोटी रुपये) पोहोचवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे...

KEM Hospital: नायरमध्ये आणखी २५ जणांवर चाचणी – another 25 people will be tested at nair hospital mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबईकरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीवर मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १०० जणांना...

मराठवाड्याची रुग्णसंख्या पाचशेच्या खाली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यात एका दिवसात आढळणाऱ्या बाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. विभागात सोमवारी (२६ ऑक्टोबर) ४३३ नवीन बाधित आढळले. विविध रुग्णालया...

Recent Comments