Home महाराष्ट्र mission begin again: सलून, ब्यूटी पार्लर सुरू करण्यास परवानगी; 'या' असतील अटी...

mission begin again: सलून, ब्यूटी पार्लर सुरू करण्यास परवानगी; ‘या’ असतील अटी – mission begin again barber shops, salons and beauty parlours with restricted entry on following condition


मुंबईः लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ची घोषणा करण्यात आली. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गंत अनेक व्यवसाय अटी व शर्तीसह पुन्हा सुरू करण्याची करण्याची परवानगी देण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांपासून ठप्प असलेल्या सलून व्यवसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. २८ जूनपासून सलून, ब्युटी पार्लर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (Maharashtra Salons Open)

२८ जूनपासून सलून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सलूनमध्ये फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली असून, दाढी करण्यासाठी परवानगी नाही. सोबतच केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. तसंच ब्यूटी पार्लर आणि सलून व्यावसायिकांसाठी काही अटी राज्य सरकारनं घालून दिल्या आहेत.

राज्यात २८ जूनपासून पुन्हा सलून सुरू होणार, फक्त केसच कापणार!

दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे अन्य सर्व नियम पाळणेही सक्तीचे असणार आहे. पुढचे काही दिवस याचे बारीक निरीक्षण केले जाईल. प्रथम काही दिवस या निर्णयाची नेमकी कशी अंमलबावणी होत आहे. नियमांचे कशाप्रकारे पालन केले जात आहे, हे पाहिले जाणार आहे.

सलून, ब्युटी पार्लरसाठी अटी

>> सलूनमध्ये केस कापण्यासाठी, हेअर डाय, वॅक्सिंग, थ्रेडिंग यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

>> त्वचेसंदर्भातील कोणत्याही सेवा चालकांना करता येणार नाहीये. तसा फलक दुकानाबाहेर लावणं बंधनकारक आहे.

>> चालकांनी मास्क, हातमोजे व अॅप्रनचा वापर करणे अत्यावश्यक

>> दुकानांतील वापरात येणाऱ्या खुर्च्या व टेबल सॅनिटाइज करणे, तसंच दर दोन तासांनी दुकानही सॅनिटाइज करणे बंधनकारक

>> ग्राहकांची सेवा करताना पुन्हा वापरता येणार नाही असे टॉवेल वापरा. नॉन- डिस्पॉजबल वस्तू वापरल्यास त्या सॅनिटाइज करणे आवश्यक

>> चालकांनी आवश्यक त्या सूचनांचा एक फलक ग्राहकांसाठी दुकानात लावावाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

Recent Comments