Home शहरं मुंबई Mithun Chakraborty's son: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाविरोधात गुन्हा - fir booked against mithun...

Mithun Chakraborty’s son: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाविरोधात गुन्हा – fir booked against mithun chakraborty’s son mahaakshay


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

आधी ‘मी टू’ आणि आता ड्रग्ज कनेक्शनमुळे बॉलिवूड चर्चेत असतानाच, आता अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय आणि त्यांच्या पत्नीच्या अडचणी वाढल्या आहेत. महाक्षय उर्फ मेमो आणि मिथुनच्या पत्नीविरुद्ध ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, गर्भपात केल्याचा आरोप महाक्षय याच्यावर, तर धमकावल्याचा आरोप मिथुनच्या पत्नीवर आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय आणि आणि पीडित तरुणी यांच्यामध्ये २०१५ पासून प्रेम संबंध होते. याच प्रेमसंबंधात असताना, महाक्षय याने लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. याचदरम्यान त्याने नवीन फ्लॅट पाहण्यासाठी बोलवले आणि सॉफ्ट ड्रिंगमधून नेशेच्या गोळ्या देऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. इतकच नाही तर लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केली. वारंवार शारीरिक संबंध ठेवले त्यातून गर्भवती राहिल्यानंतर त्याने आणि त्याच्या आईने गर्भपातासाठी धमकावले. मात्र, गर्भपात करण्यास नकार देताच महाक्षयने काही गोळ्या खाण्यास दिल्या. या गोळ्या खाल्ल्यामुळे गर्भपात झाल्याचा आरोप करीत तरुणीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी महाक्षय आणि त्याच्या आईविरोधात बलात्कार, फसवणूक, गर्भपात आणि धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर तरुणी दिल्ली येथे भावाकडे राहण्यास गेली होती. भावाला सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी दिल्लीतील रोहिणी न्यायालयात याप्रकरणी न्याय मागण्यासाठी याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाकडून प्राथमिक पुराव्यांच्या आधारे एफआयआर दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच गुन्हा घडला त्या ठिकाणी तक्रार करण्याच्या सूचना या तरुणीला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Armenia Azerbaijan War Updates: तिसऱ्या महायुद्धाची चाहुल? आर्मेनिया-अजरबैझान युद्धात ‘हा’ देश उतरणार! – armenia azerbaijan war turkey says it will send troops to help...

अंकारा/येरेवान/बाकू: आर्मेनिया आणि अजरबैझान दरम्यानचे युद्ध दोन आठवड्यानंतरही थांबले नाही. दोन्ही देशांकडून हल्ले सुरू आहेत. या युद्धामुळे आता तिसरे महायुद्ध भडकण्याची भीती व्यक्त...

काँग्रेसला निवडणुकीचे वेध

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, जिल्हा काँग्रेसही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत निश्चित नसले...

Balasaheb Vikhe Patil: बाळासाहेब विखे पाटील भाजपमध्ये गेले का गेले नाहीत? – why balasaheb vikhe patil not joined bjp then?

अहमदनगर: काँग्रेसमध्ये घुसमट होत होती म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. तेथे केंद्रीय मंत्रिपद मिळाले. मात्र शिवसेनेने अचानक अपमानजनक पद्धतीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितला. तिकडे...

Recent Comments