Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल mobile phones News: अॅपद्वारे बँकेचे व्यवहार करताना... - when transacting banking through...

mobile phones News: अॅपद्वारे बँकेचे व्यवहार करताना… – when transacting banking through the app …


दुष्यंत चोगले

सध्या भारतातील बँकिंग सिस्टम्सची गणितं वेगानं बदलत आहेत. खास करून आजच्या तंत्रज्ञानप्रेमी तरुण मंडळींकडे लांबलचक रांगांमध्ये उभं राहण्यासाठी सवड नसते. तसंच भारतातील स्मार्टफोन युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून आता बॅंकाही जास्तीत जास्त सेवा त्यांच्या अॅपमध्ये उपलब्ध करून देऊ लागल्या आहेत. अशा काही अॅप्सच्या सिक्‍यूरिटी सिस्टम्सचा घेतलेला हा आढावा…

बँकेच्या अॅपमध्ये काय गोष्टी आवश्यक?

० सिक्‍यूरिटी

हा कोणत्याही बँकिंग अॅपचा महत्त्वपूर्ण घटक आहे. टू स्टेप ऑथेंटीकेशन बरोबरच अॅपमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन असणंही तेवढंच गरजेचं आहे.

० पेमेंट सिस्टम

बँकेच्या अॅपमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बँकिंग प्रोटोकॉल्सचा अॅक्सेस हवा. उदा. एखाद्या बँकेच्या अॅपमध्ये भीम- यूपीआय, आयएमपीएस, नेफ्ट अथवा आरटीजीएस या सेवांचा समावेश असला पाहिजे.

० क्रेडीट कार्ड सेवा

बँकेच्या अॅपमध्ये एक खास क्रेडिट कार्ड विभाग असायला हवा. ज्यामुळे ग्राहकांना परस्पर क्रेडिट बिल फेडता येईल.

० एटीएम- ब्रांच लोकेटर

या आवश्यक फिचरमुळे ग्राहकांना त्यांच्या जवळ असलेली बँकेची शाखा अथवा एटीएम शोधण्यास मदत होते.

० नोटिफीकेशन सपोर्ट

प्रत्येक आर्थिक व्यवहाराची माहिती, बॅंकेचे अपडेट्स आणि योजनांची माहिती नोटिफीकेशनच्या माध्यमातून ग्राहकांना देण्याची सोय असली पााहिजे.

० इतर आवश्यक सोयी

वरील फिचर्स बरोबर काही प्राथमिक फिचर्स असणंही अपेक्षित आहे. उदा. कार्ड ब्लॉक करता येणं, पिन लॉक, पिन जनेरेशन, बॅलेन्स इनक्वायरी या इतर सोयीही तेवढ्याच अपेक्षित आहेत.

टिप्स

सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक जण बँकेचे व्यवहार अॅपच्या माध्यमातून करत आहेत. अशा वेळी खबरदारी घेणं आवश्यक आहे, त्याविषयी…

– नेहमी टू स्टेप ऑथेंटीकेशनचा वापर करा. आयफोन वापरणाऱ्यांनी बायोमेट्रिक किंवा सहा डिजिट पासकोडचा वापर करावा. तसंच अँडरॉइड युजर्सनी वरील सेटिंग्स किंवा पॅटर्न लॉक वापरावा.

– ओळखण्यास कठीण असा पिन किंवा पासवर्ड ठेवावा.

– प्ले-स्टोअर अथवा अॅप स्टोअर शिवाय इतर कोणत्याही पर्यायाचा वापर करुन अॅप्लिकेशन इन्स्टॉल करणं टाळा.

– कोणत्याही संशयास्पद एसएमएसवरील लिंकवर क्लिक करु नये. त्याच्या माध्यमातून तुमचा डेटा चोरण्याची शक्यता दाट असते.

– एनि डेस्कसारखे मोफत रिमोट डेस्कटॉप अॅप आपल्या कम्प्युटरवर इन्स्टाल करू नये. त्याचा वापर करुन कोणीही तुमचा पीसी लांबून अॅक्सेस करू शकतो.

– क्रोम किंवा सफारीवरील कॅश आणि ब्राऊजिंग डेटा नेहमी क्लिन करत जा.

– शक्यतो आपले पिन कोड्स, सीव्हीव्ही आणि पासवर्ड्स आपल्या फोनमध्ये सेव्ह करणं टाळा.

– बॅंकेचे व्यवहार करताना मोफत ओपन वायफाय नेटवर्कला कनेक्ट करू नये.

– नेहमी आपल्या खात्याचे आर्थिक व्यवहार आणि क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स तपासत राहावे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments