Home देश पैसा पैसा modi government package for poor: केंद्राने ४२ कोटी गरीबांना ५३ हजार २४८...

modi government package for poor: केंद्राने ४२ कोटी गरीबांना ५३ हजार २४८ कोटींची केली मदत! – under pradhanmantri garib kalyan yojana 53248 crore rupees given to 42 crore poor


नवी दिल्ली:करोना व्हायरस लॉकडाऊनमुळे केंद्र सरकराने आर्थिक उत्पन्न कमी असलेल्या लोकांना मदत केल्याची माहिती जाहीर केली. अर्थ मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातून ४२ कोटी गरीब लोकांना ५३ हजार २४८ कोटी इतकी मदत करण्यात आली आहे. करोना संकट आल्यानंतर २६ मार्च रोजी १.७० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. यात मोफत अन्न, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि अन्य लोकांना मदत केली गेली.

वाचा- गुंतवणूकदारांची लागली रांग; जिओमध्ये येणार आखाती पैसा!

केंद्राने दिलेल्या पॅकेजे वितरण कसे होते यावर अर्थ मंत्रालयाची नजर आहे. पीएम किसान योजने अंतर्गत ८.९ शेतकऱ्यांना १६ हजार ३९४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत २.३ कोटी कामगारांना ४ हजार ३१२.८२ कोटींची आर्थिक मदत केली गेली.

वाचा- फक्त सायकलमुळे १.८ ट्रिलियनची होऊ शकते बचत!

आतापर्यंत ३६ राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांनी १०१ लाख टन अन्नधान्य घेतले आहे. एप्रिल महिन्यात ३६.६९३ लाख टन अन्नधान्यांचे वितरण करण्यात आले. त्याचा फायदा ७३.८६ कोटी लोकांना झाला. मे महिन्यात ३५ राज्यांनी ३२.९२ लाख टन अन्नधान्य घेतले असून त्याचा फायदा ६५.८५ कोटी लोकांना झाला. याशिवाय ५.०६ लाख टन डाळ विविध राज्य सरकारांना देण्यात आली असून त्याचा फायदा १९.४ कोटी कुटुंबियांना झाला. पंतप्रधान उज्ज्वला योजने अंतर्गत ८.५८ कोटी सिलेंडर लाभार्थिंना दिले गेलेत.

वाचा- ७४ कर्मचारी झाले करोडपती; CEOचे पॅकेज ३९ टक्क्यांनी वाढले!

कर्मचारी भविष्य निधी संघटनेतील १६.१ सदस्यांनी ईपीएफओ खात्यातून ऑनलाइन पैसे काढण्याचा फायदा घेतला. या सदस्यांनी ४ हजार ७२५ कोटी रुपये पैसे काढल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले. या शिवाय ५९.२३ लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात ८९५.०९ कोटी रुपये जमा केले गेले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : उपसभापती सुनील पाटील अपात्र – deputy speaker sunil patil ineligible

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगावपंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेसला जावून मिळालेले भाजपचे करगाव गणाचे पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती सुनील साहेबराव...

ajit pawar: Ajit Pawar: ‘मुंबई पोलिसांच्या ‘या’ पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही’ – mumbai terror attacks ajit pawar paid homage to the martyrs

मुंबई: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचं रक्षण करताना शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी, एनएसजी कमांडो व गृहरक्षक दलातील जवानांचे शौर्य व त्यागाचे स्मरण...

Recent Comments