Home क्रीडा Mohammad Amir: करोनाच्या भीतीमुळे दोघा खेळाडूंनी क्रिकेट खेळण्यास दिला नकार!

Mohammad Amir: करोनाच्या भीतीमुळे दोघा खेळाडूंनी क्रिकेट खेळण्यास दिला नकार!


लाहोर: जीव घेणाऱ्या करोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्रात शांतता असली तरी गेल्या काही दिवसांपासून विविध संघटना स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रिकेटमधील सर्व स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिका रद्द करण्यात आल्या होत्या. करोनाची भीती असताना वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. वेस्ट इंडिजनंतर पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा विचार करत आहे.

वाचा- टी-२० कोण करू शकेल द्विशतक? हे आहे उत्तर!

पाकिस्तान संघाच्या या नियोजित इंग्लंड दौऱ्याआधीच दोघा खेळाडूंनी वैयक्तीक कारण देत माघार घेतली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि मधल्याफळीतील फलंदाज हॅरिस सोहेल यांनी गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर येणार नसल्याचे कळवले. पण या दोन्ही खेळाडूंच्या माघारीचे कारण करोना व्हायरस असल्याचे कळते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, आमिरने याासाठी माघार घेतली आहे. कारण त्याला दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी पत्नीसोबत रहायचे आहे. तर सोहेलने कौटुंबिक कारणामुळे दौऱ्यावर येणार नसल्याचे सांगितले.

वाचा- करोना व्हायरसचा असाही परिणाम; फटका २०२२पर्यंत बसणार!

पाकिस्तानचा संघ ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन कसोटी आणि तीन टी-२० सामने होणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या दौऱ्यावर २८ खेळाडू आणि १४ सहाय्यक स्टाफ पाठवणार असल्याचे कळते. पाकने या आठवड्यात देशातील करोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन खेळाडूंचे सराव सत्र रद्द केले होते.

वाचा- IPL संदर्भात बीसीसीआयची मोठी घोषणा

दरम्यान, पाक बोर्डाने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला दौऱ्याचा कार्यक्रम अशा पद्धतीने करण्यास सांगितले आहे जेणेकरून पाक संघ जूनमध्ये पोहोचेल. नियमीत नियोजनानुसार पाक संघ जुलैमध्ये इंग्लंडमध्ये दाखल होणार होता.

करोनामुळे खेळाडूंनी दौऱ्यातून माघार घेण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी वेस्ट इंडिजच्या तिघा खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि किमो पॉल या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी करोनामुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments