Home क्रीडा Mohammed Irfan: पाईप फॅक्टरीमधल्या मजूराच्या हाती चेंडू आला आणि करोडपती झाला -...

Mohammed Irfan: पाईप फॅक्टरीमधल्या मजूराच्या हाती चेंडू आला आणि करोडपती झाला – pakistan’s fast bowler mohammed irfan worked in pipe factory before debut in international cricket


कोणाचे आयुष्य कधी कसे बदलेल हे सांगता येत नाही. जे हात पाईप फॅक्टरीमध्ये काम करत होते. त्या हातात एकदा चेंडू आला आणि तो करोडपती झाल्याचे पाहायला मिळाले. एखाद्या सिनेमाला साजेशी ही कथा आहे एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूची. एखादी गोष्ट तुमचे आयुष्ट कसे बदलू शकते, याचे हे उत्तम असे उदाहरण आहे.

पाईप फॅक्टरीमध्ये दिवसाला ८-९ तास तो काम करत होता. हातात येत होते दर दिवसाला ४२ रुपये, म्हणजेच महिन्याला जवळपास १२०० रुपये. परिस्थिती हलाखीची होती. पण ज्याच्याकडे गुणवत्ता, चिकाटी आणि अथक मेहनत घ्यायची तयारी असते त्याचे आयुष्य बदलते, अशीच एक गोष्ट पाहायला मिळाली आहे. या व्यक्तीने संघर्ष केला. गरिबीचे दिवस होते. पण हे दिवसही बदलले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घ्यायला सुरुवात झाली.

वाचा-ऐकावं ते नवलंच… काल करोना झाला आणि आज निगेटीव्ह आला

… असे बदलले आयुष्य
हा खेळाडू पाईप फॅक्टरीमध्ये काम करत होता. त्याचबरोबर तो हौस म्हणून लेदर बॉल क्रिकेट खेळायलाही जात होता. एका क्लबविरुद्ध खेळत असताना त्याला एका माजी क्रिकेटपटूने पाहिले. त्याच्यामधील गुणवत्ता त्याला भावली. त्यानंतर त्या माजी खेळाडूने त्याच्यावर मेहनत घेतली, एखाद्या हिऱ्याला कोंदण पाडावे, तसे त्याने काम केले. दुसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने ९ फलंदाजांना बाद केले. तिसऱ्या सामन्यात तर त्याने ११ बळी मिळवले आणि राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष त्याच्याकडे गेले.

वाचा-गेल्या ५० वर्षांतील सर्वोत्तम भारतीय फलंदाज कोण? पाहा चाहते काय म्हणतात

वयाच्या २८ व्या वर्षी त्याला देशांकडून खेळण्याची संधी मिळाली. १० सप्टेंबर २०१० साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण पहिल्याच सामन्यात त्याच्याकडून चागली कामगिरी झाली नाही आणि त्याला संघातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला संधी देण्यात आली. त्यावेळी भारताविरुद्धचा सामना होता. गौतम गंभीर हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला बळी ठरला आणि त्यानंतर या क्रिकेटपटूने मागे वळून पाहिले नाही. आतापर्यंत ६० वनडे, २२ ट्वेन्टी-२० आणि चार कसोटी सामने तो आपल्या देशाकडून खेळला आहे.

मोहम्मद इरफान

हा क्रिकेटपटू आहे तरी कोण…
पाईप फॅक्टरीमध्ये काम करणारा, पण आपल्या गुणवत्तेने देशाचे प्रतिनिधीत्व करणारा हा क्रिकेटपटू आहे तरी कोण, हे जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला असेलच… हा क्रिकेटपटू आहे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान. जवळपास सात फूट उंची असलेल्या या गोलंदाजाने पाकिस्तानच्या संघाला बऱ्याचदा यश मिळवून दिले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mira-Bhayandar Municipal Corporation: मीरा-भाईंदर महापालिका अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा झटका – court asks question to mira-bhayandar municipal officers over delayed the process of making appointments of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमीरा-भाइंदर महापालिकेत चार स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून ती...

Ravichandran Ashwin: जिद्दी अष्टपैलू : रविचंद्रन अश्विन – ravichandran ashwin becomes second fastest to take 400 wickets

भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ४०० बळींचा विक्रम रचला आणि त्याचे भारतीय क्रिकेटमधील आदराचे स्थान आणखी उंचावले. भारतातील अशी कामगिरी करणारा...

Recent Comments