Home क्रीडा Mohammed Shami: आत्महत्येच्या विचारापासून मोहम्मद शमीला 'या' क्रिकेटपटूने नेलं दूर - i...

Mohammed Shami: आत्महत्येच्या विचारापासून मोहम्मद शमीला ‘या’ क्रिकेटपटूने नेलं दूर – i had the support of indian captain virat kohli and support staff to get through the tough phase, said mohammed shami


पत्नी हसीन जहाने केलेल्या गंभीर आरोपांनंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा आत्महत्येचा विचार करायला लागला होता. शमीची मानसिक परिस्थिती ढासळलेली होती. त्यावेळी त्याला या सर्व डिप्रेशनमधून बाहेर काढले ते भारताच्या एका क्रिकेटपटूने. दस्तुरखुद्द शमीने ही गोष्ट एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे.

काही महिन्यांपूर्वी शमीची पत्नी हसीन जहाने त्याच्यावर गंभीर आरोप करत त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. या गंभीर आरोपांनंतर शमीची मानसिक स्थिती ढासळली होती. पण त्यानंतर आपल्या कुटुंबियांनी यामधून बाहेर पडायला मला मदत केली, असे शमीने सांगितले होते. त्याचबरोबर शमीने यावेळी एका क्रिकेटपटूचेही नाव घेतले आहे. कारण या बिकट परिस्थितीमधून शमीला या भारतीय क्रिकेटपटूने बाहेर काढले होते.

मोहम्मद शमी आणि हसीन जहा

शमीचे लग्नानंतरही बऱ्याच बायकांशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप हसीनने केले होते. त्याचबरोबर अन्य काही गंभीर आरोपांबरोबर हसीनने शमीची पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तो काळ शमीसाठी आव्हानात्मक होता. कारण शमीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावलेले होते. त्यामध्ये जर पोलिसांनी अटक केली किंवा न्यायालयात जावे लागले तर ते शमीसाठी चांगले नव्हते. यावेळी नेमके काय करायचे, हे शमीला सुचत नव्हते. पण यावेळी शमीच्या पाठिमागे त्याच्या कुटुंबियांबरोबर भारतीय संघातील एक खेळाडू ठामपणे उभा राहीला आणि त्यानंतर शमीची मानसिक स्थिती सुधारत गेली.

maharashtra times

मोहम्मद शमी भारतीय खेळाडूंबरोबर…

कोण आहे हा भारताचा क्रिकेटपटू…
भारतीय संघ हा एका कुटुंबासारखा आहे. त्यामुळे संघातील खेळाडू एकमेकांना मदत करत असतात. शमीवर जेव्हा वाईट परिस्थिती ओढावली होती, तेव्हा त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचे काम एका क्रिकेटपटूने केले होते. हा क्रिकेटपटू होता भारताचा कर्णधार विराट कोहली.

maharashtra times

मोहम्मद शमी आणि विराट कोहली

याबाबत शमीने सांगितले की, ” मी जेव्हा डिप्रेशनमध्ये गेलो होतो, तेव्हा त्यामधून मला विराट कोहलीने बाहेर काढले. त्याचबरोबर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफने माझी मदत केली. तुझ्या मनात जो राग आहे तो मैदानात काढ, असे मला सांगण्यात आले होते. या परिस्थितीमधून मला बाहेर काढण्यासाठी कुटुंबियांबरोबर विराट कोहली आणि सपोर्ट स्टाफने मदत केली होती.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pathardi leopard attack: Leopard Attack धक्कादायक: चिमुकला आईसोबत बसला होता; बिबट्याने झडप घातली अन्… – leopard attacks four year old boy in pathardi

नगर: आईजवळ बसलेल्या चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे आज रात्री आठच्या सुमारास घडली आहे. सार्थक संजय...

Bharatpe Launches Digital Gold – आता अॅपवरून खरेदी करा सोने; ‘भारतपे’ने सादर केले ‘डिजिटल गोल्ड’

मुंबई : भारतातील सर्वात मोठी मर्चंट पेमेंट कंपनी भारतपे ने आज आपल्या प्लॅटफॉर्मवर 'डिजिटल गोल्ड' ची घोषणा केली. फिनटेक उत्पादनाच्या या नवीन कॅटेगरीचे...

Recent Comments