Home महाराष्ट्र monsoon in mumbai: मान्सून देशभरात दाखल, मात्र मुंबई कोरडीच - monsoon arrives...

monsoon in mumbai: मान्सून देशभरात दाखल, मात्र मुंबई कोरडीच – monsoon arrives across the country, but mumbai is dry


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात पोहोचल्याचे शुक्रवारी जाहीर केले. देशभरात मान्सून पोहोचला तरी महाराष्ट्रात मात्र पावसाचा प्रवास काहीसा रखडलेला आहे. मुंबई देखील पहिल्या पावसाच्या जोरदार सरींनंतर कोरडीच आहे.

यंदा १२ दिवस आधी मान्सून देशभरात दाखल झालेला असला तरी महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र गेल्या आठवड्यापासून काहीशी बदलली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये १ जूनपासूनच्या पावसाची अतिरिक्त किंवा तीव्र अतिरिक्त नोंद झाली होती. मात्र या आठवड्यातील पावसाच्या विश्रांतीमुळे काही जिल्ह्यांमध्ये एकूण पाऊस आत्तापर्यंतच्या सरासरीइतका किंवा त्यापेक्षा कमी नोंदला गेला आहे. यानंतर पुन्हा पावसाचे चक्र सुरळीत व्हायला पुढच्या आठवड्याची वाट पाहायला लागणार आहे.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता. शुक्रवारी दुपारच्या वेळीही मुंबईमध्ये हलक्या सरी पडल्या. मात्र या पावसाने जूनमधील पावसाचा अनुभव दिलेला नाही. मुंबईत शुक्रवारी संध्याकाळी सातपर्यंतच्या २४ तासांमध्ये बोरिवली येथे ३२ मिमी, दिडोंशी येथे २७ मिमी, गोरेगाव येथे २८ मिमी, कुर्ला येथे २४ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांनी इतर ठिकाणांपेक्षा थोडा अधिक पाऊस अनुभवला. तर, शहरामध्ये मात्र फारशा पावसाची नोंद झाली नाही. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाची अपेक्षित बॅटिंग सुरू व्हायला जुलैच्या पहिल्या आठवड्याची वाट पाहायला लागणार आहे. गेल्या आठवड्याभरात फारसा पाऊस न झाल्याने महाराष्ट्रातील चित्र बदलत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत मुंबई, ठाणे, पालघर येथे अतिरिक्त पाऊस झाल्याची नोंद होती. मात्र आता या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंतच्या पावसाची नोंद सरासरीइतकी असल्याचे दिसत आहे. पुढील आठवड्यातील बुधवारपासून मध्य भारतात पावसाच्या आकडेवारीमध्ये सुधारणा होईल, असा अंदाज आहे. कोकणातही या काळात वातावरणात बदल घडतील. सध्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आर्द्रतेमुळे गडगडाट आणि सोबत पावसाचा अनुभव येत आहे. आज, शनिवारसाठीही काही ठिकाणी इशारा दिला आहे. हा प्रत्यक्ष मान्सूनचा पाऊस नसला तरी यामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

देशभरातील मान्सून प्रवास

राजस्थान, हरयाणा आणि पंजाबच्या उर्वरित सगळ्या भागांमध्ये मान्सून पोहोचल्यानंतर संपूर्ण देश मान्सूनने व्यापला गेला. सर्वसाधारण तारखेपेक्षा सुमारे १२ दिवस लवकर यंदा मान्सून देशभरात पोहोचला. पश्चिम राजस्थान, पंजाब आणि हरयाणा येथे चक्रीय वातस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचे भारतीय हवामान विभागाने नोंदवले आहे. या नोंदीनंतर मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. या आधी गेल्या काही वर्षांमधील नोंदींनुसार मान्सूनने वेगाने प्रवास करून संपूर्ण देश लवकरात लवकर व्यापण्याची घटना सन २०१३ मध्ये घडली होती. १६ जून, २०१३ रोजी मान्सून देशभरात पोहोचल्याचे जाहीर करण्यात आले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cyclone nivar: निवार तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक, मुसळधार पाऊस सुरू – cyclone nivar weakens, but heavy rain in chennai, puducherry

चेन्नई :निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक देत पुढे निघून गेलंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी...

Coronavirus in Malegaon: गाफील राहू नका – nashik collector suraj mandhare has appealed follow rules and regulations to malegaon people over coronavirus

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. त्यातून मालेगाव बाहेर पडले असले, तरी दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मालेगावातील आरोग्य...

micromax in 1b first flash sale: Micromax In 1b चा पहिला सेल आज, ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत जबरदस्त फीचर्सचा फोन – micromax in 1b...

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने जोरदार पुनरागमन केले आहे. नवीन इन सीरीज कंपनीने लाँच केली आहे. या सीरीजमध्ये In Note 1 आणि...

Recent Comments