Home देश पैसा पैसा Moratorium may extended by three months: लॉकडाउन वाढला: 'EMI' स्थगितीचा कालावधी वाढणार...

Moratorium may extended by three months: लॉकडाउन वाढला: ‘EMI’ स्थगितीचा कालावधी वाढणार – emi moratorium may extend by three months


मुंबई : केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रविवारी टाळेबंदी ३१ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला लॉकडाउन जाहीर केला होता. २१ दिवसांचा हा लॉकडाउन होता. त्यानंतर ३ मे आणि १७ मे रोजी लॉकडाउन वाढवण्यात आला.

दरम्यान, लॉकडाउनमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कर्ज वसुली स्थगित करण्याचे (EMI Moratorium) निर्देश दिले होते. मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिने बँकांनी कर्ज हप्ते वसुली स्थगित केली आहे. दरम्यान, लॉकडाउन वाढवल्याने आता कर्ज हप्ते स्थगितीचा कालावधी आणखी तीन महिने वाढवला जाईल, असे ‘एसबीआय’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. तसे झाल्यास जून, जुलै आणि आॅगस्ट असे आणखी तीन महिने कर्जदारांची ‘EMI’ मधून सुटका होणार आहे.

ज्या कंपन्यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळेल त्यांना ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत कर्ज हप्ते भरण्याची गरज नाही. त्यानंतर कंपन्या सप्टेंबरमध्ये काहीअंशी कर्जफेड आणि त्यावरील व्याज भरू शकतील, असे एसबीआयने म्हटलं आहे.

करोना विषाणूमुळे पडलेला आर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी मे महिन्याच्या मध्यावधीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे. अनेक उद्योगांनी चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी व्यवसाय चालू होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे बँकांना कळवले आहे. त्यातच जमा रकमेचे व्याज कोणत्याही परिस्थितीत ३१ मे नंतर करण्याची शक्यताही नाही. त्यामुळे मोरॅटोरियमचा कालावधी वाढविण्याची सूचना काही बँकांनी रिझर्व्ह बँकेला केली होती. याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातीव बँकांच्या प्रमुखांसमवेत चर्चा केली होती. बँकांच्या मते या अतिरिक्त अवधीनंतर व्यवसायात अतिरिक्त रोख तरलतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. बँकांनी दिलेल्या माहितीनंतर केलेल्या सूचनेवर रिझर्व्ह बँकेने कोणतेही आश्वासन दिलेले नसून, वाढते लॉकडाउन पाहता या समस्येत भर पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray without mask: Nashik: मास्क न घालताच राज ठाकरे नाशिकमध्ये; माजी महापौरांना म्हणाले… – mns chief raj thackeray in nashik without wearing mask

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मास्क न घालताच ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचले. मास्कवर मास्क घालून स्वागतासाठी...

chandrkant patil on maratha reservation: नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जा; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा – chandrkant patil attacks on maharashtra government over maratha...

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन भाजप आक्रमकभाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा सरकारला इशारामराठा आरक्षणाचा मुद्द्यांवरुन राजकारण तापलं मुंबई: सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतचं नाही....

farmers protest in france: Farmers protest फ्रान्समध्येही शेतकऱ्यांचा एल्गार, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी – french farmers protest against low earnings deplore high suicide...

हायलाइट्स:फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू, शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी सुपरमार्केट्स आणि वितरण केंद्राबाहेर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलनमागील वर्षी मंजूर झालेल्या कृषी कायद्यामुळेही दिलासा...

Recent Comments