Home क्रीडा most costliest dropped catches: क्रिकेटमधील सर्वात महाग ४ कॅच; टीम इंडियाला मिळाली...

most costliest dropped catches: क्रिकेटमधील सर्वात महाग ४ कॅच; टीम इंडियाला मिळाली एवढी मोठी शिक्षा! – watch video cricket history most costliest dropped catches gets huge punishment


नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये जेव्हा विक्रमांची चर्चा होते तेव्हा फलंदाज आणि गोलंदाज यांनी केलेल्या कामगिरीचा सर्व प्रथम विचार केला जातो. फलंदाजांनी क्रिकेटच्या मैदानावर एकापेक्षा एक मोठे विक्रम केले आहेत. त्याच बरोबर गोलंदाजांनी देखील शानदारी अशी कामगिरी केली आहे. रोहित शर्माची द्विशतकी खेळी असो की युवराज सिंगचे ६ चेंडूत ६ षटकार किंवा कपिल देव सारखे गोलंदाज ज्यांनी करिअरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही.

वाचा- क्रिकेटपटूच्या आईचे निधन; सोशल मीडियावरून दिली…

आज चर्चा करणार आहोत क्रिकेटमधील कॅचबद्दल. कॅच घेतला तरच सामना जिंकता येतो (catches win matches), असे म्हटले जाते. पण जर कॅट सोडला तर त्याची मोठी किमत संबंधित संघाला मोजावी लागते. अशी किमत फक्त भारतीय संघाला नाही तर अन्य काही संघांना मोजावी लागली आहे. काहींनी सामना तर काहींनी मालिका गमावली. साधा कॅच सोडल्यामुळे एका संघाला चक्क वर्ल्ड कप गमावावा लागला. जाणून घेऊयात क्रिकेटमधील असे चार कॅच ज्याची मोठी किमत मोजावी लागली.

वाचा- वनडेत गोलंदांजाची अशी धुलाई कधीच झाली नाही; केल्या ४८१ धावा!

१) … आणि वर्ल्ड कपच हातातून गेला

१९९९च्या वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महाग कॅच ठरला असे म्हटेल तर चुकीचे ठरू नये. कारण या कॅचमुळे आफ्रिकेच्या हातातून वर्ल्ड कपच गेला. सुपर सिक्स फेरीतील या सामन्यात हर्शल गिब्सने स्टीव वॉचा अगदी सोपा कॅच सोडला. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणाला तुम्ही वर्ल्ड कप गमावला, वॉचे ते शब्द खरे ठरले. या सामन्यात वॉने नाबाद १२० धावांची खेळी केली आणि सामना जिंकला. नंतर सेमीफायनल लढतात. दोन्ही संघातील सामना टाय झाला आणि सरासरीच्या जोरावर ऑस्ट्रलिया फायनलमध्ये गेली. पुढे अंतिम सामन्यात यांनी पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्ड कप जिंकला.

वाचा- भारताकडून वनडेतील पहिले ऐतिहासिक शतक; थेट नाबाद १७५ धावा!

२) रोहितने श्रीलंकेला रडवले

वनडे क्रिकेटच्या इतिहासात एका कॅचची इतकी किमत अन्य कोणत्याच संघाला चुकवावी लागली नसले. कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात भारताच्या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध विक्रमी २६४ धावांची खेळी केली. भारतीय डावाच्या सुरुवातीला शामिंदा इरांगाच्या गोलंदाजीवर थर्डमॅनवर असलेल्या थिसारा परेराने रोहितचा एक सोपा कॅच सोडला. तेव्हा रोहित फक्त ४ धावांवर खेळत होता. त्यानंतर जे झाले त्याची नोंद इतिहास झाली. रोहितने २६४ धावा केल्या. लंकेला एका कॅचची किमत २६० धावांना पडली.

पाहा- सुशांतच्या ५० स्वप्नांमध्ये एक होते क्रिकेट खेळण्याचे स्वप्न; पाहा व्हिडिओ

३) किरन मोरेने मालिका गमावली

१९९१ साली भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. तीन सामन्यांच्या मालिका भारताने १-० गमावली. भारताचा विकेटकिपर किरन मोरेने ज्या सामन्यात एक सोपा कॅच सोडला तोच सामना भारताने गमावला. इंग्लंडचा कर्णधार ग्राह्म गूचचा कॅच किरन मोरेंनी ३६ धावांवर सोडला. त्यानंतर गूच यांनी त्रिशतकी (३३३ धावा) खेळी केली. भारताला हा कॅच २९७ धावांना पडला. इंग्लंडने या सामन्यात भारताचा २४७ धावांनी पराभव केला. भारताने फक्त मॅच नाही तर मालिका देखील गमावली.

४) वर्ल्ड कपमधील सर्वात महाग कॅच

वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महाग कॅच कोणता असेल तर तो २०१५ साली झालेल्या स्पर्धेतील म्हणावा लागेल. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या क्वार्टरफायनल सामन्यात जिरोम टेलरच्या पहिल्याच षटकात मार्टिन गप्टिलने हवेत मारलेला चेंडू मार्लोन सॅमुअल्सने सोडला. हा कॅच सोडला तेव्हा गप्टिल ४ धावांवर खेळत होता. त्यानंतर गप्टिलने २३७ धावांची द्विशतकी खेळी केली. वेस्ट इंडिजला तो एक कॅच २३३ धावांना पडला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

बुद्धिवान कलांवत :श्रीकांत मोघे

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अल्याड-पल्याड ज्या कलावंतांनी सांस्कृतिक महाराष्ट्र घडवला, मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला आकार दिला, त्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांच्या मांदियाळीतील एक अस्सल मोहरा म्हणजे . शहरी-ग्रामीण दोन्ही...

maharashtra budget 2021: राज्यासमोर आर्थिक संकट; ठाकरे सरकारपुढे आव्हान – maharashtra budget session 2021 : ajit pawar will submits the budget in the assembly

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाची धास्ती आणि टाळेबंदीमुळे गेले वर्षभर सामान्यांची घडी विस्कटली असून त्याचा परिणाम म्हणून राज्याचा महसूल घटला आहे....

Recent Comments