Home क्रीडा most sixes in a innings: एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज! -...

most sixes in a innings: एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज! – most sixes in a innings by a batsman in one day international


मुंबई: टी-२० क्रिकेटमुळे वनडेत ३५० ते ४०० धावांचा टप्पा अनेक वेळा गाठला जातो. त्यामुळेच वनडेत ३५० धावा केल्यानंतर सामना जिंकता येईल याची खात्री देता येत नाही. क्रिकेटमध्ये वेग वाढल्यामुळे फलंदाज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतात. वनडे क्रिकेटमध्ये भारताच्या रोहित शर्माने ३ वेळा द्विशतकी खेळी केली आहे. यावरूनच वनडे क्रिकेट किती बदलले आहे याचा अंदाज येतो. वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारलेल्या फलंदाजांच्या विक्रमावर एक नजर….

वाचा- एका मृत्यूने क्रीडाक्षेत्रात ढवळून निघाले

तिसारा परेरा- श्रीलंकेच्या या अष्ठपैलू फलंदाजाने न्यूझीलंडविरुद्ध ५ जानेवारी २०१९ रोजी एका डावात १३ षटकार मारले होते. माउंट माउंगनुई येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेपुढे ३२० धावांचे लक्ष दिले होते. परेराने ७४ चेंडूत १४० धावांची खेळी केली. पण परेराच्या या खेळीने लंकेला विजय मिळवला आला नाही. या सामन्यात त्यांचा २१ धावांनी पराभव झाला.

वाचा- पत्नीच्या न्यूड फोटोनंतर क्रिकेटपटूने दिले उत्तर!

कोरी अॅडरसन आणि ख्रिस गेल- १ जानेवारी २०१४ रोजी न्यूझीलंडच्या अॅडरसनने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा सर्वात वेगाने शतक करण्याचा विक्रम मागे टाकला होता. त्याने आफ्रिदीचा ३७ चेंडूतील शतकाचा विक्रम मागे टाकला आणि ३६ चेंडूत शतक केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात त्याने ४७ चेंडूत १३१ धावा केल्या. यात १४ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दोन वेळा असलेला वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलने इंग्लंड विरुद्ध ९७ चेंडूत १६२ धावा केल्या होत्या. यात ११ षटकारांचा समावेश होता. अर्थात या सामन्यात इंग्लंडने दिलेले ४१९ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजला पार करता आले नाही.

शेन वॉटसन- ऑस्ट्रेलियाच्या या माजी फलंदाजाने २०११मध्ये बांगलादेशविरुद्ध ९६ चेंडूत १८५ धावा केल्या होत्या. यात १५ षटकारांचा समावेश होता. तेव्हा वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाकडून मारण्यात आलेले हे सर्वाधिक षटकार होते.

वाचा- युवराज सिंग माफी माग; सोशल मीडियावर युझर संतप्त!

रोहित शर्मा, एपी डिव्हिलिअर्स आणि गेल- या तिनही फलंदाजांनी एका डावात १६ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. वनडेत १६ षटकार मारण्याचा विक्रम सर्व प्रथम भारताच्या रोहित शर्माने केला होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ मध्ये द्विशतकी खेळी केली होती. १५८ चेंडूतील २०९ धावांमध्ये १६ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर २०१५ मध्ये एबीने वेस्ट इंडिजविरुद्ध ४४ चेंडूत १४९ धावा केल्या. तर गेलने झिम्बब्वेविरुद्ध २०१५मध्येच १६ षटकारांसह २१५ धावांची खेळी केली.

इयॉन मॉर्गन- सर्वाधिक षटकारांच्या यादीत अव्वल स्थानी आहे इंग्लंडचा इयॉन मॉर्गन. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मॉर्गनने ७१ चेंडूत १४८ धावा केल्या होत्या. यात १७ षटकारांचा समावेश होता. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मॉर्गनच्या नावावर आहे. या सामन्यात इंग्लंडने ६ बाद ३९७ धावा केल्या होत्या आणि १५० धावांनी विजय मिळवला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Why Anti Love Jihad Law Proposed By UP and MP – ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा का?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकार कथित 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा करणार आहे. 'बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०' असे या कायद्याचे नाव आहे. राज्याच्या गृह...

mumbai news News : प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा; काँग्रेसने उपस्थित केले ‘हे’ सवाल – sachin sawant attacks on bjp over pratap sarnaik...

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी व कार्यालयात इडीने केलेल्या छापेमारीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत...

Devendra Fadnavis: BJP Government On Its Own In Maharashtra Soon Says Devendra Fadnavis – Devendra Fadnavis: ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; फडणवीसांनी पुन्हा केले...

पंढरपूर: राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार आहे आणि त्यानंतर भाजप लगेचच स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे, असे विधान आज विरोधी...

Recent Comments