Home ताज्या बातम्या MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, प्रसाद चौगुले राज्यात पहिला | News

MPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, प्रसाद चौगुले राज्यात पहिला | News


मुख्य परीक्षेसाठी राज्यातून 6825 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1 हजार 326 मुलं मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहेत.

मुंबई 19 जून : राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल लागला लागला आहे. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर  पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये 420 अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ls 15 जुलै 2019रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.

प्रसाद हा सातारा जिल्ह्यातला असून त सर्वसाधारण वर्गातून पहिला आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातला रविंद्र शेळके हा मागासवर्गियांमधून पहिला आला आहे. तर महिलांमधून अमरावती जिल्ह्यातील पर्वणी पाटील ही पहिली आली आहे. आयोगाच्या वेबसाईटवर पूर्ण निकाल देण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेसाठी राज्यातून 6825 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1 हजार 326 मुलं मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहेत. आता त्यातल्या 420 जणांची अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी निकालानंतर 10 दिवसांच्या आत ऑनलाईन फॉर्म भरावा असं आवाहन आयोगाने केलं आहे.

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे निकाल केव्हा लागेल याबद्दल मुलांच्या मनात शंका होती. निकाल लागल्याने हजारो विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

हे वाचा – 

कोरोनाला हरवण्यासाठी खास डाएट प्लॅन; पोलीस कोरोनामुक्त झाल्याचा दावा

तुकाराम मुंढेंच्या मताविरोधात ठाकरे सरकारचा निर्णय, दिला ‘हा’ आदेश

संपादन – अजय कौटिकवार

 

First Published: Jun 19, 2020 05:12 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bharatpe Launches Digital Gold – आता अॅपवरून खरेदी करा सोने; ‘भारतपे’ने सादर केले ‘डिजिटल गोल्ड’

मुंबई : भारतातील सर्वात मोठी मर्चंट पेमेंट कंपनी भारतपे ने आज आपल्या प्लॅटफॉर्मवर 'डिजिटल गोल्ड' ची घोषणा केली. फिनटेक उत्पादनाच्या या नवीन कॅटेगरीचे...

CSK vs KKR: IPL 2020: राणा दा जिंकलंस… नितिशच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरचे चेन्नईपुढे मोठे आव्हान – ipl 2020: kolkata night riders given 173 runs...

आबुधाबी: नितिश राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकून घेतली. कोलकाता नाइट रायडर्सचे फलंदाज एकामागून एक अपयशी ठरत असताना राणाने झुंजार अर्धशतकी...

Recent Comments