Home आपलं जग करियर mpsc engineering main exam: MPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची उत्तरतालिका जारी -...

mpsc engineering main exam: MPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची उत्तरतालिका जारी – mpsc engineering services main examination final answer key 2019 released


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य नागरी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ ची अंतिम गुणतालिका जाहीर केली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे.

पेपर १ आणि २ साठीची अंतिम उत्तरतालिका गुरुवारी ११ जून २०२० रोजी जाहीर झाली. https://www.mpsc.gov.in/ या संकेतस्थळावर ही उत्तरतालिका उमेदवारांना पहायला मिळेल. जे उमेदवार परीक्षेला बसले होते ते ए, बी, सी आणि डी संचाची उत्तरे पडताळून पाहू शकतात. ही उत्तरतालिका पीडीएफ फाइलच्या स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे.

17-2019-१७-२०१९ महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पेपर – १ ची उत्तरतालिका

17-2019-१७-२०१९ महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पेपर – २ ची उत्तरतालिका

एमपीएससी सिव्हिल इंजिनीअरिंग परीक्षेविषयी

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा ही पेन-पेपर परीक्षा आहेत. राज्य सरकारच्या पाणी स्रोत विभाग, बांधकाम आणि पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग या विभागांमधील सहाय्यक नागरी अभियंता पदांवरील भरतीसाठी ही परीक्षा राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येते. या सेवा परीक्षा प्रामुख्याने दोन विभागात होतात.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – गट अ
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा – गट ब

यूपीएससीच्या ISS परीक्षांसाठी नाेंदणीला सुरुवात

उमेदवारांचे वय १९ ते ३८ वर्षांपर्यंत हवे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनीअरिंग किंवा समकक्ष पदवी असलेले उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

यूपीएससी एनडीए परीक्षेची अधिसूचना ‘या’ दिवशी

निवड प्रक्रिया

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रक्रियेतील सहाय्यक अभियंता पदासाठी भरती लेखी परीक्षेमार्फत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही लेखी परीक्षा घेतली जाते. यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती होतात. मुलाखत आणि लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड होते. लेखी परीक्षा पूर्व आणि मुख्य अशी दोन टप्प्यांमध्ये होते. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

chandrakant patil: खडसेंबद्दल विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले… रात गयी, बात गयी! – bjp leader chandrakant patil on eknath khadse

पुणे: भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज बोलणं टाळलं. 'रात गयी,...

coronavirus vaccine news: Coronavirus vaccine करोना: ऑक्सफर्डची लस चाचणी अमेरिकेत पुन्हा सुरू होणार – coronavirus vaccine news astrazeneca oxford covid-19 vaccine trial resume in...

वॉशिंग्टन: अमेरिकेत पुन्हा एकदा ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस चाचणी सुरू होणार आहे. अमेरिकेत लस चाचणी सुरू करण्याबाबत नियामक मंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे. ब्रिटनमध्ये तिसऱ्या...

leopard spotted in malegaon: कळवाडी परिसरात पुन्हा बिबट्या; दोन दिवसांत २० जनावरांचा फडशा – leopards again spotted in kalwadi area malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावतालुक्यातील कळवाडी परिसरात जनावरांना पुन्हा एकदा बिबट्याने लक्ष्य केले आहे. गेल्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या तब्बल २० जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला....

Recent Comments