Home क्रीडा ms dhoni coaching: निवृत्तीच्या आधी धोनी करणार 'हे' काम; असा आहे प्लॉन...

ms dhoni coaching: निवृत्तीच्या आधी धोनी करणार ‘हे’ काम; असा आहे प्लॉन – ms dhoni going to start online coaching from july all set to become coach


नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट चाहत्यांना आजही हा प्रश्न नेहमी पडत असतो की माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी खरच पुन्हा टीम इंडियाकडून खेळणार की त्याआधीच निवृत्ती घेणार. धोनीच्या डायहार्ट चाहत्याना त्याला कधी एकदा मैदानावर पाहतोय असे झाले आहे. धोनी भविष्यात कोणता निर्णय घेणार? याचे उत्तर फक्त तो स्वत: देऊ शकतो. पण त्याने निवृत्तीच्या आधी निवृत्तीची योजना तयार केली आहे. धोनी आता प्रशिक्षक होणार आहे.

वाचा- वर्ल्ड कप २०१९: पाकविरुद्ध सामन्याआधी काय झालं होतं; खेळाडूने केला धक्कादायक खुलासा

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार धोनी येत्या २ जुलैपासून क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात करणार आहे. धोनी देशातील विविध भागातील युवा खेळाडूंना ऑनलाइन प्रशिक्षण येणार असून यासाठी त्याने एमएस धोनी क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. धोनी वय वर्ष ६ ते ८ पर्यंतच्या मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देणार आहे. धोनी प्रशिक्षणाची सुरूवात लहान मुलांपासून करणार असला तरी त्यानंतर तो सिनिअर स्तरावरील क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करेल.

वाचा- करिअरमध्ये एकही नो बॉल न टाकलेल्या गोलंदाजांमध्ये एक भारतीय!

धोनीची ही अकादमी आर्का स्पोर्ट्स प्राव्हेट लिमिटेड सोबत मिळून प्रशिक्षण देणार आहे. २ जुलै रोजी म्हणजे येत्या गुरुवारी याची सुरूवात होईल. या ऑनलाइन प्रशिक्षणाबाबत आम्हाला विविध राज्यातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लवकरच आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देणार आहोत, असे आर्काच्या एका गुंतवणूकदाराने मुंबई मिररला सांगितले.

वाचा- कसोटी क्रिकेटच्या १४३ वर्षात फक्त रवी शास्त्री अशी कामगिरी करू शकले!

याआधी आर्काने प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. आतापर्यंत २०० प्रशिक्षकांनी त्याचा फायदा घेतला आहे. २ जुलैपासून खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल. हे संपूर्ण प्रशिक्षण धोनीच्या मार्गदर्शनाखाली दिले जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डेरिक कलिनन या प्रोजेक्टचा डायरेक्टर आहे.

धोनीने २०१७ साली दुबईत क्रिकेट अकादमी सुरू केली होती. पण तो स्वत: क्रिकेटमध्ये व्यस्त असल्यामुळे अकादमीला अधिक वेळ देऊ शकला नव्हता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘करोना’शी लढताना पालिकांना आर्थिक चिंता – municipal corporation has need government fund to fight with coronavirus

औरंगाबाद: करोना संसर्गाशी दोन हात करताना महापालिकांना शासनाच्या निधीची गरज आहे, पण राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने निधी देताना हात आखडता घेतला आहे....

Maharashtra cabinet: केंद्राच्या ‘दूजाभावा’वर मंत्रिमंडळाची नाराजी – maharashtra cabinet upset on central government’s financial helps

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकार आर्थिक मदत करीत नसल्यामुळे राज्य सरकारची कोंडी होत असल्याची तक्रार करीत, मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा...

Fake SMS वरून ट्रायचा BSNL, Airtel, Jio, Vi सह कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड

नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने ग्राहकांना फेक एसएमएस पाठवल्याप्रकरणी भारतातील ८ टेलिकॉम कंपन्यांवर संयुक्तपणे ३५ कोटींचा दंड ठोठावला आहे....

Recent Comments