Home आपलं जग करियर muhs exams 2020: मेडिकल परीक्षांचे अंतिम वेळापत्रक लवकरच - muhs exams 2020...

muhs exams 2020: मेडिकल परीक्षांचे अंतिम वेळापत्रक लवकरच – muhs exams 2020 final schedule of medical examinations soon


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी अंतिम सत्राच्या लेखी परीक्षांचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. याबाबत विद्यापीठाने तात्पुरत्या स्वरूपाचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव आणि सरकारच्या आदेशांनुसार अंतिम निश्चित वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखांसंदर्भात समाज माध्यमांवर पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंजुरी दिली आहे. त्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय अभ्यासक्रमांचे उन्हाळी २०२० अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एमबीबीएस, डेंटल, बीएएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ ते २७ जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत. परंतु या परीक्षेबाबत समाजमाध्यमातून अफवा पसरवण्यात येत आहेत.

आयसीएसई परीक्षांना परवानगी देणार नाही; राज्य सरकार ठाम

याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून समाजमाध्यमांवर पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच करोनाच्या परिस्थितीनुसार राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यापीठ निर्णय घेत आहे. त्यामुळे विद्यार्थांनी सध्याचे सुरक्षित ठिकाण न सोडता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन केले आहे.

देशभरात पदवी परीक्षा होणार रद्द? लवकरच निर्णयाची शक्यता

दहावी, बारावीचा अभ्यासक्रम होणार कमी?

परीक्षा संदर्भात आवश्यक त्या सूचना विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. सरकारकडून मिळणाऱ्या आदेशानुसार अंतिम निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून इतर समाजमाध्यमांवर येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीही ट्वीट करून विद्यार्थ्यांना सुरक्षित राहण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

PM Modi: पेट्रोल पंपांवरील PM मोदींचे फोटो असलेले होर्डिंग हटवा, निवडणूक आयोगाचे निर्देश – west bengal election 2021 election commission ordesr petrol pumps to...

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका ( west bengal election 2021 ) होत आहेत. राज्यात आचरसंहिता लागू आहे. आता निवडणूक आयोगाने ( election commission...

Recent Comments