Home देश Mukesh Ambani: PM मोदींच्या नेतृत्वात देशात धाडसी सुधारणाः मुकेश अंबानी - bold...

Mukesh Ambani: PM मोदींच्या नेतृत्वात देशात धाडसी सुधारणाः मुकेश अंबानी – bold reform will pave way for india’s rapid economic progress mukesh ambani praise pm modi


गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ( pm modi ) नेतृत्वात धाडसी आर्थिक सुधारणांमुळे ( bold reform ) आगामी काळात भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, असं रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी ( mukesh ambani ) म्हणाले. पंडित दीनदयाळ पेट्रोलियम युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात व्हिडिओद्वारे मुकेश अंबानींनी संबोधित केलं. “पंतप्रधान मोदींच्या दृढ आणि प्रभावी नेतृत्वाने संपूर्ण जगाला भारताकडे एक नवीन उदयास येणारी शक्ती म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली आहे. त्यांच्या आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने संपूर्ण देशाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे, असं अंबानी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सुरू केलेल्या धाडसी सुधारणांमुळे आगामी काळात भारत वेगवान आर्थिक भरपाई करेल आणि वेगवान आर्थिक प्रगतीचा मार्गही प्रशस्त होईल, असं मुकेश अंबानी म्हणाले.

पीडीपीयू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वावलंबी भारताच्या दृष्टीकोनातून आलेली एक निर्मिती आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी ही दूरदृष्टी दिली. पीडीपीयू हे रँकिंगमध्ये असलेल्या अव्वल २५ संस्थांपैकी एक आहे, असं अंबानींनी सांगितंल.

“उर्जेचे भविष्य अभूतपूर्व बदलांसह आकार घेत आहे आणि हे बदल मानवतेच्या भवितव्यावर परिणाम करत आहेत. खरं तर ते आपल्या ग्रहाच्या भवितव्यावर परणाम करत आहेत. पर्यावर संरक्षण करून आपल्या ऊर्जा संबंधी वाढत्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी तेवढे उत्पादन करू शकतो का? हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे, असं अंबानींनी ऊर्जेसंबंधी गरजांवर भाष्य केलं.

कारवाईचे सर्व पर्याय खुले, भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

नगरोटात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा सूत्राधार कळला, निघाला मसूदचा भाऊ

पराभूत न होता हवामान बदलांचा सामना करण्याची जबाबदारीही आपल्यालाच पार पाडायची आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले. पीडीयूच्या ८ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी व्होल्टाइक पॅनलच्या ४५ मेगावॅट वीज निर्मीती प्रकल्पाची कोनशीला ठेवली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments