Home देश Mukul Rohatgi: स्वतःच्या देशाविरोधात बाजू मांडणार नाही; मुकुल रोहतगींचा टिकटॉकला नकार -...

Mukul Rohatgi: स्वतःच्या देशाविरोधात बाजू मांडणार नाही; मुकुल रोहतगींचा टिकटॉकला नकार – Wont Appear For Chinese App Against India Ex Attorney General Mukul Rohatgi Refuses To Represent Tiktok In Court


नवी दिल्ली : देशाचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी कोर्टात बाजू मांडण्यासाठी टिकटॉकला नकार दिला आहे. कोर्टात स्वतःच्याच देशाविरोधात बाजू मांडू शकत नाही, असं सांगत त्यांनी नकार दिला. केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारविरोधात याचिका दाखल झाल्यास बाजू मांडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकारची चिनी अॅप्सवर बंदी; चीनचा थयथयाट सुरू

सरकारने बंदीचा आदेश काढल्यानंतर टिकटॉक, हेलो यांसह चीनचे अॅप प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले आहेत. भारतीय युझर्ससाठी हे अॅप्स आता उपलब्ध नाहीत. युझर्स डेटाच्या सिक्युरिटीचं कारण देत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. पण भारतीय कायद्यांनुसार भारतीय युझर्सचा डेटा आणि प्रायव्हसीची काळजी घेतली जाते, असं टिकटॉकने म्हटलं आहे. आपण कोणत्याही परदेशातील सरकारला किंवा चीनला भारतीय युझर्सचा डेटा पुरवलेला नाही, असंही टिकटॉकने स्पष्ट केलं.

भारतानंतर अमेरिकेचाही चीनला दणका; ‘या’ कंपन्यांवर बंदी

टिकटॉकची बाजू मांडलेलं पत्रक टिकटॉकचे भारताचे प्रमुख निखिल गांधी यांनी स्वाक्षरी केलेलं होतं. टिकटॉकसह हेलो, शेअर इट, कॅम स्कॅनर या कोट्यवधी युझर्स असणाऱ्या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉक हे गेल्या काही दिवसात सर्वात लोकप्रिय झालेलं चायनीज अॅप होतं. दरम्यान, ही बंदी अंतरिम असून संबंधित कंपन्यांच्या प्रमुखांना सरकारसमोर बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असं सरकारने म्हटलं आहे.

५९ अॅपच्या बंदीपूर्वीच चीनचाही भारताविरोधात मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद चीनमध्येही उमटले आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी भारत सरकारच्या या निर्णयाविरोधात थयथयाट सुरू केला आहे. भारताचा हा निर्णय म्हणजे अमेरिकन सरकारची नक्कल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले की, भारताने घेतलेला हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्याजवळ जाण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेनेदेखील राष्ट्रवादाच्या आडून चिनी वस्तूंवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

चीनला अद्दल घडवा! अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर

गलवान खोऱ्यातील भारत-चीन हिंसक संघर्षानंतर उभय देशातील संबंध ताणले आहेत. १५ जूनला झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. यानंतर देशभरात चीनविरोधात संताप व्यक्त करण्यात आला, तर चीनच्या वस्तूंवर बहिष्कारासाठी मोहिमही सुरू करण्यात आली. भारत मेड इन इंडियाला बळ देत असल्यामुळे देशी वस्तूंवर जास्त भर दिला जात आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Recent Comments