Home शहरं मुंबई Mumbai airport: Mumbai Airport: 'त्या' चार राज्यांतून २०० प्रवासी आले; करोना चाचणीही...

Mumbai airport: Mumbai Airport: ‘त्या’ चार राज्यांतून २०० प्रवासी आले; करोना चाचणीही झाली अन्… – over 200 passengers arriving from 4 states tested at mumbai airport none positive


मुंबई: चार भागांतून येणाऱ्या विमान प्रवाशांमध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत एकही करोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा २०० प्रवाशांची तपासणी पूर्ण झाली आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest News Updates )

वाचा: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

मुंबईच्या विमानतळावर आगमन होणाऱ्या प्रवाशांच्या जलद करोना चाचणीची (आरटी-पीसीआर) सोय ६ सप्टेंबरपासूनच करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ऑक्टोबरअखेरपर्यंत सुमारे ८ हजार प्रवाशांची चाचणी झाली. त्यात जेमतेम १०० प्रवासी पॉझिटिव्ह सापडले. पण आता राज्य सरकारच्या आदेशानुसार राजस्थान, गोवा, गुजरात व दिल्लीहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल अत्यावश्यक आहे. ज्यांच्याकडे असा अहवाल नसेल त्यांनी विमानतळावर चाचणी करून घेणे अनिवार्य आह. या चाचणीसाठी विमानतळ प्रशासनाने विमानतळावर विशेष कक्ष तयार केला आहे. त्या कक्षात जाऊन प्रवाशांना ही तपासणी करता येत आहे. वरील चार भागांतून येणाऱ्या अशा २०० प्रवाशांची आतापर्यंत चाचणी घेण्यात आली आहे. त्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही.

वाचा: धोका वाढला! राज्यात करोना रुग्णसंख्येनं ओलांडला १८ लाखांचा टप्पा

तीन प्रवासी करोना बाधित

पश्चिम रेल्वे वरील स्थानकांत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांतील १३,२५३ प्रवाशांची गुरुवारी दिवसभरात तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६१९ प्रवाशांची करोना चाचणी केली असता त्यात तीन प्रवासी करोना बाधित सापडले. राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येत आहे.

वाचा: उपचारांसाठी डॉक्टरकडे गेला; दवाखाना बंद असल्याचे पाहून काय केलं पाहा!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

maharashtra gram panchayat election: सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात – congress claim 50 percent of gram panchayat election won in maharashtra

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने सर्वाधित जागा जिंकल्या आहेत, असा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. १९० ग्रामपंचायतींत सरपंच...

Ram Kadam: वेबसिरीजमुळं ‘तांडव’; आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात – bjp mla ram kadam detain by mumbai police

मुंबईः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची तांडव ही वेबसिरीज प्रदर्शनानंतर लगेचच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी तांडवविरोधात आक्रमक भूमिका...

Nilesh Rane criticises Maha Vikas Aghadi: Nitesh Rane Targets Maha Vikas Aghadi And Its Leaders – त्यांचा अंत वाईट असतो; नीलेश राणेंचा रोख कोणाकडे?...

मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन वर्ष उलटून गेले तरी या नव्या समीकरणाची चर्चा थांबताना दिसत नाही....

Recent Comments