Home शहरं मुंबई Mumbai Auto Fare: प्रवाशांच्या खिशाला कात्री; मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता - mumbai...

Mumbai Auto Fare: प्रवाशांच्या खिशाला कात्री; मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता – mumbai taxi and auto fares may be hiked by 2-3


मुंबईः लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर आता हळू-हळू जीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. काही व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगीही दिली आली आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. मात्र, रिक्षा टॅक्सी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास महाग होणार आहे. मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यामध्ये दोन ते तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

गोरेगावच्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; भाजपनं आकडेवारीच दिली

खटुआ समितीने सादर केलेल्या अहवालाच्या शिफारशीनंतर मुंबईतील रिक्षा-टॅक्सीच्या दरांबाबत मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणनं (एमएमआरटीए) हिरवा कंदिल दाखवला आहे. आरटीओ आणि ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन मिळून दरवाढीचा आकडा ठरवल्यानंतर एमएमआरडीएकडून रिक्षा टॅक्सींच्या नवीन भाडेसूत्राच्या शिफारसीला मंजुरी देण्यात येईल. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिफारसीला मंजुरी मिळाल्यास दोन ते तीन रुपयांपर्यंत भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

वाचाः मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिक कारागृहात मृत्यू

लॉकडाऊनंतर भाडेवाढ झाल्यास प्रवाशी वर्गाला याचा चांगलाच फटका बसणार आहे. पण, रिक्षा , टॅक्सी चालकांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. लॉकडाऊनमध्ये रिक्षा व टॅक्सीचालकांचं आर्थिक उत्पन्न बंद झालं होतं. अनेकांची गाड्यांचे हप्ते थकले आहेत. भाडेवाढीमुळं आम्हाला हप्ते फेडणे सुकर जाईल. तसंच गेल्या तीन महिन्यांपासून काम नसल्यानं शिल्लक रक्कमही आता संपत आली आहे. त्यामुळं जर भाडे वाढ झालीस अनेक चालकांना पुन्हा नव्याने काम सुरू करण्यास चालना मिळेल. असं ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष यांनी सांगितलं.

मात्र, असं असलं तरी प्रवासी हक्क कार्यकर्त्यांनी भाडेवाढीला विरोध केला आहे. करोना संकटाच्या काळात झालेली हा भाडेवाढ सामान्य नागरिकांना परवडणार नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bsnl daily 5gb data plan: BSNL च्या ‘या’ प्लानमध्ये ८४ दिवसांपर्यंत रोज ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग – bsnl daily massive 5gb data...

नवी दिल्लीः BSNL आपल्या ५९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना रोज ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसारखी सुविधा देत आहे. या प्लानची वैधता ८४...

anil deshmukh on arnab goswami: Arnab Goswami: अर्णब गोस्वामी यांना अटक होणार?; गृहमंत्री देशमुख यांनी दिले मोठे संकेत – will take action against arnab...

मुंबई:रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः...

housewife women: घरकामामुळे जोपासता येईना आवड – women says we are most time is spend in housework therefore not getting time for passion

म. टा. प्रतिनिधी, नाशिकस्वयंपाकघरात अधिक वेळ घालवावा लागत असल्याने आपली आवड जोपासता येत नसल्याचे मत ८४ टक्के महिलांनी नोंदविल्याची माहिती पुढे आली आहे....

Recent Comments