Home शहरं नाशिक Mumbai Blast Accused Yusuf Memon Dies In Nashik Jail - Mumbai Blast...

Mumbai Blast Accused Yusuf Memon Dies In Nashik Jail – Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा कारागृहात मृत्यू


नाशिक: मुंबईमध्ये झालेल्या १९९२-९३मधील बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुविख्यात गुंड टायगर मेमनचा भाऊ युसूफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आज सकाळी मृत्यू झाला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ( mumbai blast accused yusuf memon dies )

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला युसूफ मेमन (वय ५४) आज सकाळी १०.३० वाजता इसाक सोबत बाथरूम परिसरात ब्रश करत होता. यावेळी युसूफ अचानक कोसळला. त्यामुळे त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा मृतदेह धुळ्याला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. युसूफ मेमन हा या हल्ल्यातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा भाऊ होता. टायगरला फाशीची शिक्षा झालेली असून तो पाकिस्तानात पळून गेल्याचं सांगितलं जातं. त्याचा दुसरा भाऊ इसाक मेमन हा देखील नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. हे दोघेही २०१८पासून या कारागृहात शिक्षा भोगत आहे. युसूफवर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि कटात सहभाग घेतल्याचा आरोप आहे. बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी आपला फ्लॅट दिल्याचा या दोघांवरही आरोप होता.

मुंबईवरील बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी ४ नोव्हेंबर १९९४ रोजी १० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. याप्रकरणाची २२ वर्ष टाडा कोर्टात सुनावणी चालली. ६०० लोकांची साक्ष घेण्यात आली होती. याप्रकरणी २००६ मध्ये कोर्टाने याकूब मेमन आणि अभिनेता संजय दत्तसह १०० आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर २३आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याप्रकरणात आतापर्यंत १४ दोषींना फाशी ठोठावण्यात आली आहे. यात २०१५मध्ये याकूब मेमनला फाशी दिली गेली आहे. तर अबू सालेमसह २२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तनेही शिक्षा भोगली आहे.

करोनाची लस येण्याआधीच बिल गेट्स यांचं चिंता वाढवणारं वक्तव्य

मोदींनी अप्रत्यक्षपणे साधला ‘या’ काँग्रेस नेत्यावर निशाणा; म्हणाले…

यातील एक आरोपी अब्दुल कय्यूमला जून २०१७मध्ये मुक्त करण्यात आलं होतं. सध्या या प्रकरणातील आरोपी टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमसह २७ आरोपी फरार आहेत.

रामदेव बाबांच्या ‘कोरोनिल’ला साडेसाती; विक्री किंवा जाहिरात केल्यास गुन्हा दाखल होणारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna...

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला....

Recent Comments