Home शहरं मुंबई Mumbai Coronavirus: मुंबईतल्या 'या' खासगी लॅबमध्ये दोन हजारात होणार करोना टेस्ट

Mumbai Coronavirus: मुंबईतल्या ‘या’ खासगी लॅबमध्ये दोन हजारात होणार करोना टेस्ट


मुंबई: करोना टेस्टच्या नावाखाली रुग्णांची लुटालुट सुरू असतानाच एका खासगी लॅबने चक्क दोन हजारात करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या लॅबने पत्र लिहून तशी परवानगी देण्याची विनंतीही मुंबई महापालिकेला दिली आहे.

सध्या मुंबईतील खासगी रुग्णालयात करोना टेस्टसाठी ४ हजार ५०० रुपये आकारले जात आहेत. थायरोकेअर रुग्णालयाने केवळ दोन हजार रुपयांत करोना टेस्ट करण्याचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला आहे. तसं पत्रंही थारोकेअरने पालिकेला लिहिलं आहे. विशेष म्हणजे करोना तपासणीतील निदानातील चुकांबाबत याच थायरोकेअर हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

मुंबई महापालिकेने घेतलेल्या प्रत्येक स्वॅब नमुन्याची तपासणी करण्यासाठी आम्ही केवळ दोन हजार रुपये आकारू. जर आमच्या टेक्निशियनने हे सँपल घेतले तर प्रती तपासणीमागे २५०० रुपये आकारण्यात येईल, असं थायरोकेअरने पालिकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मुंबईतील प्रत्येक खासगी लॅबमध्ये करोना चाचणीसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. सार्वजनिक लॅबमध्ये करोना टेस्ट मोफत आहे. तर खासगी प्रयोगशाळेत किमान ४५०० रुपये आकारले जात आहेत.

केईएममध्ये सात मृतदेह पडून; नातेवाईक येईनात; पालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

दरम्यान, खासगी रुग्णालयातील करोना चाचणीचे दर ठरविण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सात दिवसात हे दर ठरवणार आहे. राज्याच्या आरोग्य विमा सोसायटीचे सीईओ सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

करोना संकटाला संधीत रुपांतरित करण्याची हीच वेळ; मोदींचे आवाहनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

festival special trains: Special Trains 2020: पाहा, सणासुदीसाठी नव्या स्पेशल ट्रेन कधी धावणार? – irctc see festival special trains full list 2020 by indian...

नवी दिल्ली: रेल्वेने सणासुदीचे दिवस पाहता काही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यांमध्ये काही दररोज चालणाऱ्या ट्रेन असून काही साप्ताहिक ट्रेन आहेत....

Aaditya Thackeray visits City Centre Mall: सिटी सेंटर मॉल आग: आदित्य ठाकरेंनी केले अग्निशमन जवानांच्या प्रयत्नांचे कौतुक – city centre mall fire: environment minister...

मुंबई: दक्षिण मुंबईतील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेली आग अजूनही धुमसत असून आगीत मोबाइलच्या सुट्या भागांचा सर्वात मोठा बाजार भस्मसात झाला आहे....

pakistan in fatf grey list: Pakistan पाकिस्तानला झटका; FATFच्या करड्या यादीत कायम – pakistan to remain on fatf grey list on terror financing

पॅरिस/इस्लामाबाद: 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी धडपड करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे. पॅरिसमध्ये झालेल्या 'एफएटीएफ'च्या ऑनलाइन...

Recent Comments