Home शहरं मुंबई Mumbai Coronavirus Update: Mumbai Coronavirus Update: मुंबईत ७५४ कंटेन्मेंट झोन तर, ६२५३...

Mumbai Coronavirus Update: Mumbai Coronavirus Update: मुंबईत ७५४ कंटेन्मेंट झोन तर, ६२५३ इमारती सील – mumbai covid-19 tally rises to 80 262 with 1554 cases; 57 deaths


मुंबईः करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुबंईत आता रुग्ण दुपटीचा वेग ४१ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ६३ टक्के इतका आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्यानं वाढ होताना दिसत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. (Mumbai Coronavirus Update)

आज मुंबईत एकूण ५ हजार ९०३ जण विविध रुग्णालयातून सुखरूप घरी परतले आहे. तर, करोनावर मात केलेल्यांची संख्या ५० हजार ६९४ इतकी झाली आहे. तसंच, सध्या २४ हजार ८८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात करोनामुक्तांची संख्या लाखावर; आज तब्बल ८०१८ रुग्ण झाले बरे

मुंबईत आज १ हजार ५५४ नव्या रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या ८० हजार २६२ इतकी झाली आहे. तर, आज करोनामुळं जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या ५७ इतकी आहे. हे सर्व ५७ मृत्यू ४८ तासांत झालेले आहेत. त्यातील ४३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यातील ३१ रुग्ण पुरुष व २६ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४ जणांचे वय ४० वर्षाखालील होते. तर, ३४ जणांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित१९ रुग्ण ४० ते ६० वर्षा दरम्यान होते.

जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात बुडून पाच जणांचा मृत्यू

२५ जून ते ०१ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण करोना रुग्ण वाढीचा दर १. ७२ टक्के इतका होता. तर ०१ जुलै २०२० पर्यंत ३ लाख ३९ हजार ७९६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

७५४ कंटेन्मेंट झोन

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्राचा (कंटेन्मेंट झोन) नव्याने आढावा घेतला असून, सध्या मुंबईत ७५४ कंटेन्मेंट झोन असून, ६२५३ इमारतींचा भाग सील करण्यात आला आहे. सील केलेल्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी दाटीवाटीचा झोपडपट्टी परिसर असून, अनेक ठिकाणी सुरक्षित वावराचे नियम पाळले जात नसल्याने करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ज्या विभागात रुग्ण सापडतात, त्या परिसरात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून सुरक्षा वाढवली जाते. ज्या भागात साथ आटोक्यात आली, तेथील प्रतिबंधित क्षेत्र काढून सुरक्षा कमी केली जाते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gupkar Declaration: काश्मिरात हालचालींना वेग; मेहबूबा मुफ्तीच्या निवासस्थानी आज मोठी बैठक – gupkar declaration peoples alliance for declaration meeting at mehbooba mufti residence

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या निवासस्थानी पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशची (PAD) आज बैठक होत...

Devendra Fadnavis Corona Positive: देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण; केलं ‘हे’ आवाहन – opposition leader devendra fadnavis tests positive for covid 19

मुंबई: करोना काळात राज्यभर दौरे करणारे व लोकांना भेडसावणारे प्रश्न राज्य सरकारकडे मांडणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे....

Recent Comments