Home महाराष्ट्र Mumbai Fire : मुंबईत बँकेच्या कार्यालयात मोठी आग; महत्त्वाची कागदपत्रे जळाली -...

Mumbai Fire : मुंबईत बँकेच्या कार्यालयात मोठी आग; महत्त्वाची कागदपत्रे जळाली – Mumbai : Fire Breaks Out At Bank Office In Nariman Point Area


मुंबई: नरीमन पॉइंट भागातील जॉली मेकर इमारतीतील एका बँकेच्या कार्यालयात आज पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत कुणीही जखमी झाले नसले तरी बँकेतील कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याची माहिती आहे. (Fire at bank office in Mumbai)

वाचा: आजच्या ठळक बातम्या अगदी मोजक्या शब्दांत

जमनालाल बजाज मार्गावर असलेल्या जॉली मेकर चेंबर २ या इमारतीच्या तळमजल्यावर बँक ऑफ बहरीन अँड कुवेतचे कार्यालय आहे. सुमारे ४ हजार चौरस फुटांच्या या कार्यालयातील सर्व्हर रूममध्ये ही आग लागली. आगीत बँकेतील फर्निचर, एसी, संगणक, इलेक्ट्रिक वायरिंग व काही फाइल्स जळून खाक सांगण्यात येते. दरवाजे, खिडक्या बंद असल्यामुळं धुराचे लोट संपूर्ण कार्यालयात पसरले होते.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बँकेचा दरवाजा तोडला आणि कुलिंग ऑपरेशन सुरू केले. बऱ्याच प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण समजू शकलेलं नाही. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.

Live: राज्यभरात आतापर्यंत ७३ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्तSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ज्येष्ठ नागरिकास फसविले

म. टा. प्रतिनिधी, मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्यांनी वृद्धाच्या बँक खात्यातून परस्पर लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे....

फसवा विकास; फसवी मंडळे!

अॅड. विलास पाटणे विशाल द्वैभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीनंतर गुजराती भाषिक प्रदेशात गुजराती भाषिक राज्याच्या निर्मितीची मागणी वाढली. पुढेमागे या भाषिक अस्मितेच्या लाटेमुळे ही दोन्ही...

Recent Comments