Home शहरं मुंबई Mumbai hospital news: Corona Positive Women Delivery : गोड बातमी! सायन रुग्णालयातील...

Mumbai hospital news: Corona Positive Women Delivery : गोड बातमी! सायन रुग्णालयातील २५१ करोनाग्रस्त महिलांची सुखरुप प्रसूती – 251 Corona Patient Women Delivery In Sion Hospital


मुंबईः करोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात दर दिवसाला होणारे करोनाबाधितांचे मृत्यू चिंता वाढवणारे आहेत. अशातच मुंबईतील सायन रुग्णालयातून एक गोड बातमी समोर येत आहे. गेल्या २३ मार्चपासून ते आतापर्यंत २७० करोनाग्रस्त गर्भवती महिलांची प्रसूती करण्यात आली. यापैकी २५१ मातांची सुखरूप प्रसूती झाली असून त्यांनी निरोगी बालकांना जन्म दिला आहे.

गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत सायन रुग्णालयात २५१ कोव्हिड बाधित मातांची सुखरुप प्रसूती असून त्यांनी एकूण २५२ करोना निगेटिव्ह बालकांना जन्म दिला आहे. यातील ११ बालके पहिल्या चाचणीत करोना पॉझिटिव्ह आढळली होती. मात्र, काही दिवसांनतर दुसरी चाचणी केल्यानंतर ही सर्व बालके निगेटिव्ह आढळली आहेत. या सर्व मातांची प्रसूती स्त्रीरोग तज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अरुण नायक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या.

वाचाः आजारपणात बहिणीनं फोन केल्याचा आनंद वाटला: धनंजय मुंडे

२१ जूनपर्यंत २७० करोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. यापैकी १४१ सिझेरियन आणि १०९ नैसर्गिकरीत्या प्रसूती करण्यात आली. या व्यतिरिक्त १२ गर्भपात आणि ५ एकटॉपिक होते. अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितलं.

वाचाः तुम्हाला नक्कीच स्मृतीभ्रंश झालेला नसावा; आव्हाड आता स्मृती ईराणींवर बरसले

रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांनी ‘पीपीई किट’ घालून घामाच्या धारा वाहत असताना अक्षरशः २४ तास अविरत मेहनत घेऊन नवजीवन फुलवण्यात अत्यंत महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली आहे. या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ‘पीपीई किट घातल्यानंतर सलग सहा तास पाणी न पिता अव्याहतपणे काम केले आहेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BJP: बेस्ट खासगीकरणाविरोधात भाजप आक्रमक – bjp has apposed privatization of best buses and conductor jobs recruitment on contract basis

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई बेस्ट उपक्रमात ४०० बस भाडेतत्त्वावर आणि कंडक्टर कंत्राटी घेण्याच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेस्टच्या खासगीकरणाच्या डावात...

Recent Comments