Home क्रीडा Mumbai Indians: बापरे...मुंबई इंडियन्सबरोबर काम केलेल्या क्रिकेटपटूला झाला करोना - nafees iqbal...

Mumbai Indians: बापरे…मुंबई इंडियन्सबरोबर काम केलेल्या क्रिकेटपटूला झाला करोना – nafees iqbal bangladeshi former player tested positive in corona virus test, who work with mumbai indians in ipl on 2018


सध्याच्या घडीला एक धक्कादायक बातमी समोर आली असून मुंबई इंडियन्सबरोबर काम करणाऱ्या एका व्यक्तीला करोना व्हायरसची लागण झाल्याचे आता समोर आले आहे.

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला सर्व खेळाडू आपल्या घरीच आहेत. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफही आपल्या घरी आहे. पण करोना कसा होऊ शकतो, हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ही बातमी जेव्हा चाहत्यांनी वाचली तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण मुंबई इंडियन्सबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीला जर करोना झाला तर आयपीएलचे काय होणार, हा प्रश्न त्यांना पडला आहे.

वाचा-धक्कादायक, सौरव गांगुलीच्या कुटुंबियांना झाली करोनाची बाधा

जर आयपीएलमधील संघाशी निगडीत असलेल्या व्यक्तीला करोना झाला, तर काय करायचे याबाबत अजून बीसीसीआयने ठरवलेले नाही. पण संघाशी निगडीत असलेल्या व्यक्तीला करोना झाल्यामुळे आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडू सुरक्षित आहे की नाही, हा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.

हा व्यक्ती आहे तरी कोण…
ही व्यक्ती २०१८ साली मुंबई इंडियन्सच्या संघाबरोबर होती. त्यावेळी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रेहमान हा मुंबईच्या संघाबरोबर जोडला गेलेला होता. त्याची मदत ही व्यक्ती करत असल्याचे पाहायला मिळाले होते. करोना झालेली ही व्यक्ती आहे बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू नफीस इक्बाल. नफीस हा बांगलादेश संघाचा कर्णधार तमीम इक्बालचा भाऊ आहे. आता नफीसला करोना झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या संपर्कातील लोकांचीही करोना चाचणी करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला नफिसची प्रकृती सुधारत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांची चिंता कमी झाली आहे.

वाचा-विराटची पत्नी अनुष्का प्रेग्नेंट असल्याचे फोटो व्हायरल, जाणून घ्या फॅक्ट चेक…

नफीस हा मुस्ताफिझूरमुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचा एक भाग झाला होता. मुस्ताफिझूरला बरीच भाषेची अडचण येत होती. त्यामुळे नफीस मुस्ताफिझूरसाठी भाषांतरकार म्हणून काम करत होता. नफीसने २००३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २००५ साली त्याने १२१ धावांची खेळी साकारली होती, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. नफीस २००६ नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Recent Comments