Home शहरं मुंबई Mumbai local train news: 'या' कर्मचाऱ्यांनाही रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; राज्याचं केंद्राला...

Mumbai local train news: ‘या’ कर्मचाऱ्यांनाही रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; राज्याचं केंद्राला साकडं – Maharashtra Government Request To The Ministry Of Railways To Allow Travel In Mumbai Local Central Government Employee


मुंबई: केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणारं पत्र राज्य सरकारनं केंद्र सरकारला लिहिलं आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्राने लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली नसल्याचं उघड झालं असून भाजप नेते आशिष शेलार यांनी चुकीचा दावा केला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

केंद्र शासनाची वेगवेगळी कार्यालये/आस्थापना, उच्च न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकामधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवनागी देण्यात यावी,अशी विनंती राज्यशासनाने रेल्वेला केली आहे. याविषयीचा अंतिम निर्णय रेल्वेमार्फत घेतला जाईल. केंद्र शासनाच्या कार्यालयांमध्ये आयकर विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट, कस्टम(जकात) आणि संरक्षण(डिफेन्स) विभागाचा समावेश आहे. कार्यालयीन वेळांमधील बदलांच्या अटी आणि शर्तींसह लोकलने प्रवासाची परवानगी राहील. लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली कार्यालये /आस्थापना यांच्या कार्यालय प्रमुखांनी आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांना पासेस देणे आवश्यक आहे. राज्य शासनाने या आधी केंद्र शासनाच्या कार्यालयांच्या उपस्थिती संदर्भात ज्या अटी घातल्या होत्या त्याचे पालन करणे बंधनकारक राहील. त्याशिवाय सामाजिक अंतर(सोशल डिस्टन्सिंग), मास्क, सॅनिटायझेशन या सारख्या बाबींचे पालन करणे आवश्यक आहे, असंही सूत्रांनी सांगितलं.

करोना महासंकटाची टांगती तलवार!; WHO ने दिला ‘हा’ इशारा

तुमच्या वीज बिलाचे आकडे का वाढलेत माहित्येय? ‘ही’ आहेत कारणं

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी एक ट्विट करून संरक्षण विभाग, आयकर, जीएसटी, कस्टम आणि पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना मुंबईच्या लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी दिल्याबद्दल शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभारही मानले आहेत. रेल्वे मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पत्र लिहून शेलार यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. आपली ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याचा दावा शेलार यांनी केला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देणाऱ्या आदेशाचं पत्र केंद्र सरकारनं राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवल्याचा दावाही त्यांनी केला होता. तर आमच्याकडे रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत सूचना आली नसल्याचं सांगत रेल्वेने शेलारांचा हा दावा फेटाळून लावला होता.

दरम्यान, तब्बल दोन महिन्यानंतर १५ जून रोजी मुंबईत पहिली लोकल धावली होती. केवळ राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सुरू करण्यात आलेली आहे. इतर सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्कॅनिंग केल्यानंतर त्याच्याकडील ओळखपत्रं पाहिलं जातं. त्यानंतरच त्याला रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळता यावेत म्हणून एका फेरीत केवळ ७०० प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे.

कोरोनिलवर पतंजलीचा यू-टर्न; नोटिशीला दिले ‘हे’ उत्तरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

trp scam case: टीआरपी घोटाळा : ‘रिपब्लिक’च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स – trp scam case : crime branch special squad summons to five republic tv...

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक टीव्हीच्या पाच गुंतवणूकदारांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स जारी...

shiv sena: बिहारमध्ये शिवसेनेचे २३ उमेदवार – shiv sena has fielded 23 candidates in the bihar assembly elections

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्राची बदनाम करणाऱ्या बिहारमधील सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्यासाठी शिवसेनेने तेथील विधानसभा निवडणुकीत २३ उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. यातील...

Recent Comments