Home शहरं मुंबई Mumbai lockdown: मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यावर निर्बंध...

Mumbai lockdown: मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यावर निर्बंध – maharashtra lockdown: prohibitory orders extended in mumbai till may 17


मुंबई: करोना रोखण्यासाठी निर्बंधाची गरज लक्षात घेत मुंबई पोलीस पुढे सरसावले आहे. राज्य सरकारने सोमवारी दिलेल्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनी शहरात रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडण्यावर निर्बंध आणले आहेत. आज मध्यरात्रीपासून हा आदेश लागू असेल.

मुंबईत करोनामुळे २४ तासांत १८ मृत्यू; ५१० नवीन रुग्णांची भर

मुंबई पोलिसांनी सोमवारी सायंकाळी उशीरा काढलेल्या आदेशानुसार लोकांना घराबाहेर पडण्यास परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सायंकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत एकाहून जास्त व्यक्तीस वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त बाहेर पडण्यावर मनाई केली आहे. हा मनाई आदेश मोडल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत यापूर्वी असलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरू असल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू तसेच औषधांची कोणतीही गैरसोय होणार नाही, हेसुद्धा स्पष्ट झाले आहे.

> देशात आणि राज्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची मुदत वाढवण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून १७ मेच्या मध्यरात्रीपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या आदेशानुसार चार किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमा होण्यास मनाई राहणार आहे.

> मुंबई हा करोनासाठी रेड झोन बनला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशाने पावले उचलण्यात आली आहेत. त्यातही सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू तसेच औषधांच्या खरेदीसाठी मर्यादित स्वरूपात बाहेर जाण्याची मुभा राहणार आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक असेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याचवेळी कंटेंटमेंट झोननुसार यात आवश्यक बदल असतील असेही या अधिकाऱ्याने सांगितले. नियमांचे उल्लंघन केल्यास कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: पेट्रोल पंपांवरील PM मोदींचे फोटो असलेले होर्डिंग हटवा, निवडणूक आयोगाचे निर्देश – west bengal election 2021 election commission ordesr petrol pumps to...

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका ( west bengal election 2021 ) होत आहेत. राज्यात आचरसंहिता लागू आहे. आता निवडणूक आयोगाने ( election commission...

Recent Comments