Home शहरं मुंबई Mumbai metro: आता गिरगावकरांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा - clear the way for...

Mumbai metro: आता गिरगावकरांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा – clear the way for the rehabilitation of girgaonkars


‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) गिरगाव येथील प्रकल्पबाधितांसाठी इमारत बांधण्यात येत असून, त्यासाठी मागविण्यात आलेल्या पूर्वअर्हता निविदेला (प्रीकॉलिफिकेशन बीड) बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या इमारतीमध्ये कुलाबा-वांद्रे-सिप्झ (मेट्रो-३) प्रकल्पामुळे बाधित झालेले रहिवासी, व्यावसायिक व कार्यालयांचे पुनर्वसन केले जाणार आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या गिरगावमधील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. काळबादेवी, गिरगाव पुनर्वसन आराखड्याअंतर्गत लवकरच सहा वेगवेगळ्या भूखंडांचा एकत्रितरित्या विकास केला जाणार आहेत. एकूण सहा भूखंडांपैकी के२, के३, जी३ हे भूखंड एकात्मिकरित्या विकसित केले जातील; तर के१, जी १ व जी२ हे भूखंड मेट्रोसंबंधी कामांसाठी वापरण्यात येणार आहेत. एमएमआरसीतर्फे के३ ही इमारत बांधण्यासाठी मे. वास्काँन या कंपनीची आधीच निवड झाली असून, या इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

गिरगाव येथील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठी पूर्वअर्हता अर्ज दाखल केलेल्या कंपन्यांमध्ये जेएमसी प्रोजेक्ट (इंडिया), टाटा प्रोजेक्टस लिमिटेड, एल अँड टी लिमिटेड, वास्कॉन इंजिनिरिंग लिमिटेड, शपूरजी पालनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, मोंटोकारलो लिमिटेड, कॅपसाइट इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड, न्याती इंजिनीअर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन लिमिटेड व नाथानी पारेख कन्स्ट्रक्शन लिमिटेड आदींचा समावेश आहे.

‘या कामासाठी विविध कंपन्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला याचा आनंद आहे. या पुनर्विकसित इमारती काळबादेवी व गिरगाव भूमिगत मेट्रो स्थानकाच्या संलग्न बांधण्यात येणार असल्याने हा पुनर्विकासाचा आराखडा खूप महत्त्वाचा आहे. काळबादेवी व गिरगाव येथील बरेच भूखंड लहान आहेत व रस्ता रुंदीकरणामुळे व नवीन डीसीपीआरप्रमाणे तेथे विकास होणे अशक्य होते. मात्र या प्रकल्पाच्या यशामुळे याभागात अनेक सामूहिक विकासाला चालना मिळेल’, अशी प्रतिक्रिया एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.

… अशी असेल रचना

गिरगाव पुनर्विकास इमारतीमध्ये ४७३ रहिवासी सदनिका, १३७ व्यावसायिक आस्थापना व १९व्यावसायिक कार्यालयाचा समावेश राहील. या ४८ मजली इमारतीचे तीन तळ मजले सेवा, तसेच पार्किंगसाठी राखीव असतील व ग्राउंड लेव्हल, एक ते सात मजले अंशतः व्यावसायिक गाळे व सेवा देण्यासाठी राखीव असतील. आठ ते नऊ मजले व्यावसायिक गाळे, सेवा, तसेच सुविधांसाठी राखीव असतील. १० ते १८ मजल्यांवर व्यावसायिक गाळे, तसेच सदनिका असतील व १९ ते ४८ मजल्यांवर रहिवासी सदनिका असतील. या इमारतीस कार पार्किंगची सुविधा, तसेच बगीचा आदी सुविधा राहतील. एकूण ४८ मजल्यांपैकी ३९ मजले रहिवासी सदनिकांसाठी राखीव असतील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments