Home शहरं मुंबई mumbai news News : अखेर यादी जाहीर! - finally the list is...

mumbai news News : अखेर यादी जाहीर! – finally the list is released!


एमएमएमओसीएलकडून ९८ उमेदवारांची निवड

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील डीएननगर ते मंडाळे (२ ए) व दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (मेट्रो ७) या मार्गांवर विविध पदांवर काम करण्यासाठी उर्वरित ९८ जागांसाठी निवड झालेल्या पात्र उमेदवारांची यादी अखेर एमएमएमओसीएलतर्फे अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. ‘मटा’च्या बातमीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याने निवड झालेल्या पात्र उमेदवारांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे २०२१ मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित असलेल्या मेट्रो ७ व २ ए या मार्गांसाठी स्टेशन, ट्राफिक कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आदी पदांसाठी भरती करण्यात येत आहे. यापैकी ४२ प्रशिक्षणार्थी यापूर्वीच हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी दाखल झालेले आहेत. मात्र, उर्वरित पदांसाठी निवड झालेल्या पात्र उमेदवारांची यादी अद्याप जाहीर करण्यात आली नव्हती. यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. किमान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करावी जेणेकरून निवड झालेले विद्यार्थी निर्धास्त होतील तर निवड न झालेले विद्यार्थी पुढील परीक्षेच्या तयारीला लागतील, असा युक्तिवाद उमेदवारांकडून करण्यात येत होता. ही बाब १३ मे रोजी, ‘एमएमआरडीए भरतीमध्ये घोळ?’ तर १५ मे रोजी ‘उमेदवारांचा प्रश्न कायम!’ अशा मथळ्याखाली वृत्तामधून समोर आणली होती. अखेर एमएमएमओसीएलतर्फे शनिवारी ही यादी जाहीर करण्यात आली.

‘महाराष्ट्र टाइम्स’ने पात्र उमेदवारांचा प्रश्न लावून धरला. त्यामुळे संबंधित प्रशासनाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच आम्ही देखिल इतर उमेदवारांप्रमाणे रुजू होऊ याचा आनंद आहे,’ अशी भावना अनेक उमेदवारांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Crime: अमोल कोल्हेंच्या नावाने बिल्डरकडे मागितले पैसे; पुढे काय घडले पाहा – money demanded from builder in the name of amol kolhe

पुणे:लॉकडाऊन काळात एका बिल्डरला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी...

Prakash Javadekar: जावडेकरांचा राहुल गांधींवर पलटवार; म्हणाले, ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चिथावले’ – rahul gandhi wasn’t only supporting protest but also instigating says union min...

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकर्‍यांच्या हिंसाचाराचा ( tractor rally violence ) ठपका कॉंग्रेसने सरकार आणि पोलिसांवर ठेवला असतानाच कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या ट्विटला भाजपने शेतकरी...

Recent Comments