Home शहरं मुंबई mumbai news News : 'अतिदक्षता विभागाचे आठवडाभरात ५०० नवे बेड' - 'intensive...

mumbai news News : ‘अतिदक्षता विभागाचे आठवडाभरात ५०० नवे बेड’ – ‘intensive care unit gets 500 new beds in a week’


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोनारुग्णांच्या सुविधेसाठी मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेड आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी सांगितले.

राज्यातील करोनाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास ५० टक्के असून मुंबईतील धारावी बागातून गेल्या काही दिवसांपासून रुग्ण येण्याची संख्या मदावली आहे, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना सेव्हन हिल, सेंट जॉर्ज येथे आठवडभरात सुमारे ५०० आयसीयू बेड उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

केंद्राने प्रतिबंधित विभागासाठी केलेले निकष बदलण्याची मागणी टोपे यांनी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. अशा विभागात शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलिस तैनात केले जातात. त्यामुळे राज्यातील पोलिस मोठ्या संख्येने अशा विभागांच्या ड्युटीवर आहेत. त्यांना आराम मिळावा तसेच हा पोलिस फोर्स अन्यत्र वापरता यावा यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा, असे टोपे यांनी नमूद केले.

लोकलसेवा सुरू करावी

मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी टोपे यांनी केली. करोनाव्यतिरिक्त क्षयरोग, पावसाळ्यात होणारे आजार, मलेरिया, डेंग्यू याच्या नियंत्रणासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असेही ते म्हणाले.

…..

वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी

अधिष्ठाता निलंबित

खान्देशातील जळगाव येथील करोनाबाधित वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आला होता. याप्रकरणी शासकीय वैद्यकीय कॉलेजचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

punjab government: पंजाबचे बंड – punjab state government challenge central government over farm laws

केंद्र सरकारच्या शेतीविषयक तीन नव्या कायद्यांना रस्त्यावर होत असलेला विरोध आता विधिमंडळापर्यंत पोहोचला असून, पंजाबमधूनच त्याची सुरुवात झाली आहे. पंजाब विधानसभेने केंद्राच्या तिन्ही...

Eknath Khadse: खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या एकाचे मंत्रिपद जाणार – one ncp minister will has resign from his post for eknath khadse

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या...

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

Recent Comments