Home शहरं मुंबई mumbai news News : आदिवासीही झाले तंत्रस्नेही - tribals also became technology...

mumbai news News : आदिवासीही झाले तंत्रस्नेही – tribals also became technology friendly


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

गरज ही शोधांची जननी आहे. विज्ञानात गरजेपोटी मानव कल्याणाच्या दृष्टीने अनेकानेक शोध लागले. परंतु, अशा नवनवीन शोधांच्या जगापासून कोसो दूर असलेल्या आणि दोन वेळच्या जेवणाचीच भ्रांत असलेले आदिवासींही करोनाच्या संकटकाळात गरजेपोटी तंत्रस्नेही झाले आहेत. ‘इंटरनेट’ आणि ‘ऑनलाइन’ यांची अजिबात कल्पना नसलेले आदिवासी आता दररोज ‘झूम’ अॅपवर बोलू लागले आहेत आणि त्यावरच बैठका घेऊन आपले प्रश्न मांडू लागले आहेत!

हे चित्र आहे ठाणे जिल्ह्यातील वाडा, मोखाडा यांसारख्या अनेक आदिवासी भागांतले. लॉकडाउनमुळे कुठेही जाणे अत्यंत जिकिरीचे झाले असल्याने आणि आपल्या मूलभूत समस्या प्रशासनापर्यंत तसेच आदिवासी कार्यकर्त्यांपर्यंतही पोचवणे मुश्कील झाल्याने आदिवासी भागांतील अनेक आदिवासींनी एखाद्याकडे असलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून ‘झूम’वर ऑनलाइन संवाद साधणे गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. त्यातून कुठेही न जाता सहजगत्या संवाद साधणे शक्य होत असल्याने हे आदिवासी बांधवही हरखून गेले आहेत.

‘लॉकडाउनमुळे आम्हाला आमचे प्रश्न संघटनेतील कार्यकर्त्यांपर्यंत पोचवता येत नव्हते आणि तेही आमच्यापर्यंत येऊ शकत नव्हते. त्यामुळे हा पर्याय समोर आल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यात नेटवर्कच्या समस्येमुळे कधी-कधी अडचण होत असल्याने माळरानावर जाऊनच आम्हाला संवाद साधावा लागतो’, असे यासंदर्भात एका आदिवासीने सांगितले.

आदिवासींच्या प्रश्नांसाठी झटणारे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी याविषयी अधिक माहिती दिली. ‘लॉकडाउनमुळे आदिवासी भागांत आदिवासींचे हाल होऊ लागले. त्यांना जीवनावश्यक वस्तूही मिळणे मुश्कील झाले. त्यामुळे आम्ही प्रशासनांकडे तक्रारी केल्या. मात्र, सरकारी कार्यालयेच जवळपास बंद असल्याने कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अखेरीस आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका केली. त्यानंतर आदिवासी भागांत कोणीही उपाशी राहणार नसल्याची खबरदारी घेण्याची हमी सरकारने न्यायालयात दिली. मात्र, तरीही समस्या कायम राहिल्याने आम्ही आंदोलन सुरू केले. त्यामुळे आम्ही करोनाचा धोका लक्षात घेऊन सुरक्षित वावरचा नियम पाळून ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले. त्यानंतर सविनय कायदेभंगाचे आंदोलनही सुरू केले. या आंदोलनांच्या तयारीसाठी विविध भागांतील आढावा घेणे, आदिवासींशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे होते. कार्यकर्त्यांना खूप अडचणी येत होत्या. याचदरम्यान वाडामधील ममता परेड नावाची आमची कार्यकर्ती, जी पुण्यात सध्या पत्रकारिता अभ्यासक्रम शिकण्यासाठी आहे, तिने आम्हाला झूमचा पर्याय सांगितला. त्यामुळे त्याची तोंडओळख करून घेतल्यानंतर त्याचा वापर आम्ही सुरू केला’, असे असे पंडित यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

नवा पर्याय आत्मसात

विशेष म्हणजे, आदिवासी बांधवांनीही संवादाचा नवा पर्याय आत्मसात केला असून, ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्याच्या माध्यमातून दररोज २०-३० आदिवासी बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. यामुळे निरक्षर आदिवासींच्या जगण्यालाही आता नवा अर्थ लाभला आहे. या संकटकाळाने त्यांच्यासमोर हा नवा पर्याय दिला आहे’, असे विवेक पंडित यांनी सांगितले.

फोटो कॅप्शन :

मोखाडामध्ये गुरुवारी मोबाइलची रेंज शोधत माळावर गटागटात बसून ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेले आदिवासी.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

शिवसेना-भाजपला मिळाले सभापतीपद

म. टा. वृत्तसेवा, येथील महानगरपालिकेच्या स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी ( दि २७ ) ऑनलाइन पद्धतीने...

aurangabad News : ‘स्मार्ट सिटी’साठी आणखी दीडशे कोटी – rs 150 crore more for ‘smart city’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून आणखीन १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासनाने दिलेल्या निधीच्या...

Recent Comments