Home शहरं मुंबई mumbai news News: एमटीएनएल पतपेढीची ११ लाखांची मदत - 11 lakh assistance...

mumbai news News: एमटीएनएल पतपेढीची ११ लाखांची मदत – 11 lakh assistance from mtnl credit bureau


म टा…

Updated:

MT

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अनेक आर्थिक संकटामुळे अडचणीत सापडलेले महानगर टेलिफोन निगमच्या (एमटीएनएल) कर्मचाऱ्यांनी करोनाच्या संकटात आपल्या सामाजिक जाणिवेचे भान दाखवले आहे.

करोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत बिकट परिस्थितीत अडकलेल्या एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक सहाय्यासाठी धाव घेतली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एमटीएनएल सहकारी पतपेढीने ११ लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी दिला आहे. एमटीएनएलच्या गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत हजारो कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. एमटीएनएलमध्ये सध्या १,५०० कर्मचारी उरले आहेत. तरीही करोनाविरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस सहाय्य करण्याचे आवाहन लक्षात घेत पतपेढीचे सदस्य पुढे आले आहेत. या पतपेढीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाख ११ हजार १११ रु.चा धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा धनादेश सहायता निधीस देण्यासाठी खासदार अरविंद सावंत यांना पतपेढीचे सचिव संजय ढोलम, खजिनदार मधुकर घाडी, कामगार संघाचे सरचिटणीस दिलीप जाधव, संचालक प्रदीप परब यांनी नुकताच सुपूर्द केला.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ajit pawar: Ajit Pawar: ‘मुंबई पोलिसांच्या ‘या’ पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही’ – mumbai terror attacks ajit pawar paid homage to the martyrs

मुंबई: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचं रक्षण करताना शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी, एनएसजी कमांडो व गृहरक्षक दलातील जवानांचे शौर्य व त्यागाचे स्मरण...

aurangabad News : रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून चार लाख वसूल – four lakh recovered from those who spit on the road

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहर विद्रुपीकरण टळावे, नागरिकांना शिस्त लागावी या उद्देशाने महापालिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर, रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्या...

ms dhoni: MS धोनी नव्या भूमिकेत; या चित्रपटात करणार मुख्य रोल – ms dhoni will play the lead role in the film

रांची: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आता मनोरंजन क्षेत्रात येणार आहे. धोनीने १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती...

Recent Comments