Home शहरं मुंबई mumbai news News : केशकर्तनालय चालक 'कात्री'त - hairdresser driver in 'katri'

mumbai news News : केशकर्तनालय चालक ‘कात्री’त – hairdresser driver in ‘katri’


परप्रांतीय व्यावसायिकांबाबत तक्रार

अनेक परप्रांतीय कारागिरांनी घरोघरी जाऊन बेकायदा केस कापण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडेही संस्थेने लक्ष वेधले आहे. शासनाने नोंदणीकृत सलून, ब्युटीपार्लर मालकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

prathmesh.rane@timesgroup.com

tweet : @PrathmeshRaneMT

मुंबई : मुंबईतील जवळपास साडेपाच हजारांहून अधिक केशकर्तनालय, युनिसेक्स सलून मागील महिनाभरापासून बंद आहेत. अनेक केशकर्तनालय मालक-कारागिरांसाठी, लेडीज ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महिलांसाठी ही संचारबंदी दिवसागणिक अधिक हलाखीची होत चालली आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आमच्यावर देखील रस्त्यावर येण्याची वेळ येईल, अशी चिंता प्रत्येक केशकर्तनालय मालकाला सतावत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे निर्बंध घालून आठवड्यात किमान दोन दिवस केशकर्तनालय (सलून) सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सलून-ब्युटीपार्लर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

राज्यभरात संचारबंदी लागू झाल्यानंतर हातावर पोट असलेल्या कामगारांची होणारी दयनीय अवस्था हळुहळू लोकांसमोर येत असून नाभिक समाजही करोनाच्या विळख्यात अडकला आहे. रोजंदारीवर अवलंबून असलेल्या सलून कामगारांच्या उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘केस कापताना ग्राहकाच्या अगदी जवळ उभे राहावे लागते. संसर्गाची भीती आहे. मात्र, आम्हालाही जीवाची काळजी असून, तरीही आम्ही लोकांच्या अधिक जवळ जाऊन काम करण्याचा धोका पत्करण्यास तयार आहोत. मात्र हा धोका पत्करताना सुरक्षेचे शक्य तितके सगळे निकष आम्ही पाळण्यास तयार आहोत’, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

सद्यस्थितीत केवळ करोनाविरोधात नाही तर समाजमाध्यमांवर नाभिक समाजाच्या व्यवसायाबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवांसोबत एक वेगळीच लढाई सुरू असल्याचे अनेक सलून मालक सांगतात. संसर्ग पसरण्याचा आणि आमच्या व्यवसायाचा संबंध जोडला जात असल्याचा आरोप ते करतात. आधीच पोटात खड्डा पडला असताना, अशा अफवांमुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

सलून मालक-कामगारांची अवस्था अत्यंत बिकट असून राज्य शासनाने आठवड्यातील किमान दोन दिवस केशकर्तनालय खुले ठेवण्याची परवानगी द्यावी. यावेळी सुरक्षेबाबत शक्य ती सर्व काळजी घेण्याचे आदेश आम्ही संस्थेशी संलग्न केशकर्तनालय मालकांना देऊ. सुरक्षेच्या दृष्टीने कारागिरांकडून मास्क, हातमोजे तसेच सॅनिटायझरचा वापर, निर्जंतुकीकरण केलेल्या साधनांचा वापर, केवळ मास्क घातलेल्या ग्राहकांना प्रवेश आदी नियमावली प्राथमिक स्तरावर तयार करण्यात आली आहे. शासनाने किमान अर्थिक मदत जाहीर करायला हवी. – दत्तात्रय चव्हाण, संस्थापक अध्यक्ष (सलून-ब्युटीपार्लर असोसिएशन)

सुरुवातीच्या दिवसात संचारबंदी लवकर उठेल, अशी आशा होती. मात्र मागील काही दिवसांपासून परिस्थिती बिकट होत चालली आहे. मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय कारणांमुळे माझे पती देखील घरीच असतात. अशावेळी माझ्या छोट्या ब्युटीपार्लर व्यवसायाचा कुटुंबाला आधार होता. मात्र संचारबंदीमुळे सर्वकाही कठीण होऊन बसले आहे. रेशनिंगच्या धान्यावर अवलंबून आहोत. घरभाडे, ब्युटीपार्लरच्या जागेचे भाडे थकीत आहे. शासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा.

– सुनीता वाकडे (सलोनी ब्युटीपार्लर)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Adesh Bandekar Selected As Brand Ambassador Of Matheran – आदेश बांदेकर बनले माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर; नेमकं काय करणार? | Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधीमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची निवड करण्यात आली...

Recent Comments