Home शहरं मुंबई mumbai news News: दवाखाने उघडा, अन्यथा परवाना रद्द - open the clinic,...

mumbai news News: दवाखाने उघडा, अन्यथा परवाना रद्द – open the clinic, otherwise the license will be revoked


नर्सिंग होम, खासगी डॉक्टरांना आयुक्तांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

करोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी खासगी नर्सिंग होम व दवाखाने सुरू न केल्यास परवाने रद्द करण्याचा निर्वाणीचा इशारा मुंबई पालिकेने दिला आहे. दवाखाने बंद असल्याने अन्य आजार असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जे खासगी नर्सिंग होम, खासगी दवाखाने सुरू झालेले नसतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिकेच्या सर्व २४ विभागातील सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्राचे सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणादरम्यान जी नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करावी. तर जे खासगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांच्याबाबत माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ नुसार कारवाई सुरू करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर

सोसायट्यांवरही बडगा

सोसायटी परिसरात, चाळी, भाड्याच्या जागेत असणारे नर्सिंग होम किंवा दवाखाने उघडण्यास सोसायटीतील व्यक्ती, मालक किंवा शेजारी अडथळा आणत असतील अथवा दवाखाने बंद ठेवण्यासाठी दबाव आणत असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचा व गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can...

नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची...

gujarat coronavirus: एक अॅम्ब्युलन्स अन् चार मृतदेह… गांधीनगरमध्ये करोनाने होणारे मृत्यू लपवले जाताहेत? – gujarat coronavirus dead bodies in ambulance photo viral nitin patil...

अहमदाबादः गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ( gujarat coronavirus ) सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल ( viral photo ) होतोय. या व्हायरल फोटोत एका...

Recent Comments