Home शहरं मुंबई mumbai news News : दिवाळी अंकांच्या संपादकांना ‘बहुविध’कडून मदतीचा हात - a...

mumbai news News : दिवाळी अंकांच्या संपादकांना ‘बहुविध’कडून मदतीचा हात – a helping hand to diwali special issues (diwali ank 2020)


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘करोना’ने विविध प्रकारची संकटे आपल्या जगण्यापुढे उभी केली आहेत. मराठी संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग असलेल्या दिवाळी अंकांपुढेही यावेळी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी डिजिटल स्वरूपात दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. अत्यंत मेहनतीने आकाराला येणारे हे अंक केवळ हौसेचा मामला ठरू नयेत यासाठी ‘बहुविध.कॉम’ या डिजिटल प्लॅटफॉर्मने मदतीचा हात पुढे केला आहे.

वाचा: ‘सीमावादावर नक्की खरं कोण बोलतंय? भारताचे राजदूत की पंतप्रधान?’

दिवाळी अंक ही मराठी साहित्यविश्वातील महत्त्वाची परंपरा आहे. अनेक लेखक या निमित्ताने विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहितात. प्रस्थापित आणि नवोदित कथालेखक, कवी दिवाळी अंकांसाठी उत्तम साहित्य राखून ठेवतात. या अंकांच्या केवळ पीडीएफ वितरीत करणे हा या साहित्यावर अन्याय ठरतो. या अकांना ई-साहित्याचे स्वरूप दिले तर त्यातून वाचनाचा खरा आनंद मिळू शकेल. ई-स्वरूपात साहित्यप्रेमींना हा अंक देण्यासाठी मोठा खर्च करून डिजिटल प्लॅटफॉर्म करावा लागतो. बहुविधकडे असा प्लॅटफॉर्म आणि जाणकार वाचक दोन्ही आहे. त्यांच्यापर्यंत आपले दिवाळी अंक वा नियतकालिक निःशुल्क अथवा सशुल्क दोन्ही प्रकारे पोचविण्याची सोय ‘बहुविध’कडे आहे. या संबंधी तांत्रिक अथवा इतर माहिती देण्यास बहुविध उत्सुक असून या संबंधी किरण भिडे यांच्याशी ९८२१०१४७१६ या क्रमांकावर अथवा kiranvbhide@gmail.com या मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Live: राज्यात करोनामुक्त रुग्णांची संख्या ८० हजारच्या उंबरठ्यावरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Eknath Khadse: खडसेंचा भाजपला रामराम; राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या ‘त्या’ शब्दाची आठवण – ncp workers welcome eknath khadse to party

म.टा. प्रतिनिधी, नगर: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नियोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाचे पक्षातून स्वागत जोरदार स्वागत होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेस सोडून...

Rajnath Singh: ‘सचिन-सहवागसारखीच सलामीची हिट जोडी बिहार निवडणुकीच्या मैदानात’ – bihar election bjp jdu pair is like the opening pair of sachin sehwag in...

भागलपूर: बिहार विधानसभा निवडणुकीच्या ( bihar election ) प्रचारासाठी भागलपूरमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ( rajnath singh ) यांची प्रचारसभा झाली. राजनाथ यांनी आपल्या...

Recent Comments